शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा

By बापू सोळुंके | Updated: June 30, 2024 14:40 IST

छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले  कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा ...

छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले  कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस हवालदार तेलुरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. बाबासाहेब मुळे, मोहनभाई देवराव मुळे, मालन मोहनभाई मुळे, महेंद्र सोनवणे यांचा मेव्हणा आणि वधूसह तीन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

या घटनेविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पुण्यवर्धन चंद्रभान साळवे (३२,रा. पवननगर)यांचा विवाह शहरातील एका मुलीसोबत गतवर्षी सन २०२३ मध्ये झाला होता. विवाहानंतर पाच ते सहा महिन्यानंतर वधूच्या पहिल्या लग्नासंदर्भात साळवे यांना समजले. त्यांनी याविषयी पीडितेला विचारणा केली असता तिचे पहिले कोर्ट मॅरेज झाल्याची कबुली दिली. पहिल्या पतीसोबत तुम्हाला सोडून कधीही जाऊ शकते, असे तिने साळवे यांना सांगितले.

यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. जिच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याचे स्वप्न पाहिले त्या तरूणीने पहिले लग्न लपवून आपल्यासोबत दुसरे लग्न केले. एवढेच नव्हे तर तिच्या नातेवाईकांनी ही बाब लपवून ठेवल्याचे समजल्याने साळवे यांनी २९ जून रोजी दुपारी सिडको पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नाेंदवली.

टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजी