शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

भरधाव टँकरच्या धडकेत मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:04 IST

वाळूज महानगर : टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडलेली एका आठ वर्षीय चिमुकली टँकरच्या चाकाखाली सापडून ठार ...

वाळूज महानगर : टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडलेली एका आठ वर्षीय चिमुकली टँकरच्या चाकाखाली सापडून ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीसगावच्या खवड्या डोंगराजवळ घडली. नम्रता दिलीप शिरसाट (८, रा. तीसगाव परिसर) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे आई - वडील, भाऊ व मामाची मुलगी असे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, दिलीप मोहन शिरसाट (३५ रा. तीसगाव परिसर) हे गुरुवारी (दि. ३) जोगेश्वरी येथून पत्नी जयश्री (३०), मुलगा सिद्धार्थ (१२), मुलगी नम्रता (८) व सिरसाठ यांच्या मेव्हण्याची मुलगी डॉली ऊर्फ स्नेहल रामदास भोसले (६) असे पाच जण दुचाकीने (एमएच २० बीडी ६४६७) तीसगावला घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, मनमाडहून इंधन भरून तीर्थपुरीकडे (ता. आंबड) जाणाऱ्या भरधाव टँकरने (एमएच २२ एह ३३४४) त्यांच्या दुचाकीला खवड्या डोंगराजवळ धडक दिली. या अपघातात टँकरच्या चाकाखाली सापडून नम्रता घटनास्थळीच ठार झाली, तर उर्वरित चौघेजण जखमी झाले. या अपघातानंतर टँकर चालक मारहाणीच्या भीतीने टँकरसह सुसाट वेगाने ए. एस. क्लबच्या दिशेने पसार झाला. हा अपघात पाहताच नितीन पनबिसरे, सुनील जोगंदड, सचिन पाले व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी अपघातस्थळ गाठून जखमींना मदत केली. यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या एका खासगी कारमध्ये मयत नम्रता तसेच जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा. निरीक्षक मंगलसिंग घुनावत, पोहेकॉ. तुकाराम पवार, पोकॉ. राहुल लोखंडे, राजेश मैत्रकर आदींनी अपघातस्थळाची पाहणी केली.

टँकर चालकाला पाठलाग करून पकडले

घटनेनंतर टँकरचालक ए. एस. क्लबच्या दिशेने पसार होत असताना नितीन पनबिसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही अंतरावर त्याला पकडले. यानंतर टँकरचालकास अपघातस्थळी आणून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अपघातास कारणीभूत कृष्णा सुभाष बोडखे (२३, रा. टुणकी, आचलगाव, ता. वैजापूर) या टँकरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवस साजरा करून परतत होते

या अपघातात ठार झालेली नम्रता दिलीप सिरसाठ हिच्या मामाची मुलगी डॉली उर्फ स्नेहल रामदास भोसले हिचा बुधवारी (दि. २) वाढदिवस असल्याने नम्रता ही आई-वडील, भाऊ सिद्धार्थ यांच्यासोबत दुचाकीने जोगेश्वरी येथे गेली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर दिलीप सिरसाठ हे रात्री तीसगावला घरी परतले तर त्यांची पत्नी व दोन मुले जोगेश्वरीत मुक्कामाला थांबले होते. गुरुवारी सकाळी दिलीप सिरसाठ हे पत्नी व मुलांना आणण्यासाठी जोगेश्वरीत गेले होते. यावेळी डॉली उर्फ स्नेहल भोसले हिने सोबत येण्याचा हट्ट केल्याने तिला सोबत घेऊन तीसगावकडे निघाले होते. घरापासून काही अंतरावरच टँकरने दुचाकीला धडक दिल्याने नम्रता हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फोटो ओळ

तीसगाव खवड्या डोंगरालगत टँकरने दुचाकीला धडक दिल्याने चिमुकली ठार झाली असून, चौघे बालंबाल बचावले. अपघातास कारणीभूत ठरलेला टँकर व अपघातग्रस्त दुचाकी छायाचित्रात दिसत आहे. इन्सेटमध्ये मयत नम्रता शिरसाट.