शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षातून मुलीची उडी: बायकोसोबतच्या भांडणातून मुलीला अश्लाघ्य प्रश्न, चालकाची कबुली

By राम शिनगारे | Updated: November 16, 2022 19:34 IST

आरोपीची चौकशीत माहिती : तीन दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद : अश्लाघ्य प्रश्न विचारल्यामुळे अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातुन रस्त्यावर उडी घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली. या आरोपीने पत्नीसोबत घरात भांडण झाल्यामुळे तणावात दारू पिली. दारूच्या नशेतच मुलीसोबत अश्लाघ्य बोललो अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी सांगितले.

सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) या चालकाने गोपाल टी येथून रिक्षात बसलेल्या अल्पवयीन मुलीला कौटुंबिक माहिती विचारल्यानंतर शाळा, कॉलेज, क्लासविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्याने तुला सोबत फिरायला आवडेल का? असेही विचारले. मुलगी यापुर्वी रिक्षात बसलेली असल्यामुळे तिने वडीलधारी चालकाला सर्व माहिती दिली. त्यामुळे चालकाने सिल्लेखाना चौकातून उजवीकडे रिक्षा वेगात घेऊन जात असताना त्याने तुला सेक्स करायला आवडेला का? अशी विचारणा केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने संकल्प क्लाससमोर रस्त्यावर उडी घेतली. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी तात्काळ रिक्षाचा शोध घेत आरोपी चालक सय्यद अकबर यास बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पत्नीसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या तणावात सकाळीच दारू पिलो, त्यानंतर रिक्षात बसलेल्या मुलीला अश्लाघ्य बोललो असेल अशी कबुली दिली. दरम्यान, विविध चालक रिक्षात बसलेल्या मुलींना अशाच पद्धतीची टॉन्टीग करीत असतात. त्यांच्यातील चर्चेतुनच आरोपीने मुलीसोबत असे वर्तन केले असावे, असा अंदाजही पोलिसांनी काढला आहे. त्याशिवाय पोलीस कोठडीत आरोपीकडून अधिक माहिती मिळेल, असेही क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले.

मुलीची प्रकृती धोक्याबाहेररिक्षातुन उडी टाकल्यामुळे गंभीर जखमी मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आली असून, अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, निरीक्षक डॉ. गणपत दराडे, तपास अधिकारी अमाेल सोनवणे यांच्यासह पथकाने आरोपीस न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपी सय्यद अकबर यास तीन मुली असून, सर्वात मोठी मुलगी ही १४ वर्षांची असल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद