शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळला २८ काेटींच्या बायपासला मान्यता; घृष्णेश्वर मंदिर, लेणी परिसर होणार प्रदूषणमुक्त

By विकास राऊत | Updated: January 11, 2023 12:03 IST

वेरूळ लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नेहमी जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लेणीवर परिणाम होत आहे.

औरंगाबाद : श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरूळ विकास आराखड्यातील वेरूळ येथील लेणी क्रमांक १ ते महादेव मंदिर या चौपदरी डांबरी वळण रस्त्याला सोमवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली. सुमारे २८ कोटींतून होणाऱ्या या रस्त्यामुळे घृष्णेश्वर मंदिर व लेणी परिसर वाहतुकीच्या कोंडीसह प्रदूषणापासून मुक्त होण्यास मदत होण्याचा दावा केला जात आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा, नियोजन अधिकारी भारत वायाळ, आदींची उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी वळण रस्ता करण्याची आवश्यकता कशी आहे, याची माहिती उच्चाधिकार समितीला दिली. ते म्हणाले, ‘वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेणी व ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्यामुळे जगातील विविध देशांतून पर्यटक व भाविक वेरूळ येथे भेट देतात. ही लेणी औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे नेहमी जड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लेणीवर परिणाम होत आहे. प्रस्तावित वळण रस्ता मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व वाहतूक या रस्त्यावर वळविण्यात येईल, जेणेकरून पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होणार नाही. मागील महिन्यात वेरूळ येथील दुकानदारांशी संवाद साधला असता लेणी परिसरातील दुकानदार एमटीडीसीच्या व्हिजिटर सेंटरमध्ये स्थलांतरित होण्यास तयार असल्याचेही पाण्डेय यांनी समितीला सांगितले.

भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे रस्ता आवश्यकविभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले, ‘बाह्य वळण रस्त्यामुळे लेणी व मंदिर परिसर प्रदूषणमुक्त होईल. भविष्यात वाढणाऱ्या वाहनांची संख्या, पर्यटक, भाविकांची संख्या लक्षात घेता हा वळण रस्ता होणे आवश्यक आहे. या वळण रस्त्यासाठी (बायपास) २७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी लागणार असून, वळण रस्त्यासाठी उच्चाधिकार समितीने मान्यता द्यावी. विभागीय आयुक्तांच्या मागणीनंतर विकास आराखड्यातील वेरुळ येथील लेणी क्रमांक १ ते महादेव मंदिर या चौपदरी बीटी वळण रस्त्याला उच्चाधिकारी समितीने मान्यता दिली.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद