श्रीक्षेत्र माहूर: श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी प्रशासक विनायकराव फांदाडे यांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चा करून २५ रोजी दुपारी १२़३० वाजता उदे ग अंबे उदे, श्री रेणुका माता की जयच्या गजरात घटस्थापना करण्यात आली़घटस्थापनेनंतर १२़३० ते २ पर्यंत छबिना मिरवणूक काढण्यात येवून परिवार देवता श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजा भवानी मंदिर, श्री भगवान परशुराम मंदिरात घटस्थापना करण्यात आली व घटस्थापनेच्या वेळी पहिली माळ चढविण्यात आली व विधीवत पूजाअर्चा करून नैवेद्य दाखविण्यात आला़ यावेळी पुजारी चंद्रकांत रिठे उपस्थित होते़ नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती़भाविकांची संभाव्य होणारी गर्दी पाहता पोलिस उपअधीक्षक श्यामकांत घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलिस निरीक्षक डॉ़ अरूण जगताप यांनी शहरातील टी पॉर्इंट ते रेणुकादेवी संस्थान, श्री दत्त शिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थान, श्री महाकाली माता संस्थानचे रस्ते वाहतूक व्यवस्था पोलिस बंदोबस्ताचा पायी फिरून आढावा घेत पोलिस यंत्रणेस दक्ष राहण्याच्य सूचना केल्या़ यात्रेनिमित्त आलेल्या भविकांसाठी श्री रेणुका देवी संस्थान श्री सुरकर बंधू व शहरातील टी पॉर्इंट येथे कृष्णप्रिय गोशाळा यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती़ रेणुका देवी संस्थानवर प्रशासक भवानीदास भोपी, कार्यालय अधीक्षक पी़ डी़ चव्हाण आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
उदे ग अंबे उदे़़़ च्या गजरात माहुरात घटस्थापना
By admin | Updated: September 26, 2014 00:43 IST