शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयाची वाटचाल खाजगीकरणाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:07 IST

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.

ठळक मुद्देसरकारी रुग्णालयांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध सेवांचे खाजगीकरण करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. ग्णालयावरील भार कमी करून थेट आऊटसोर्सिंगद्वारे विविध सेवा घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधार ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (घाटी) खाजगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. आऊटसोर्सिंगने ६० कर्मचारी घेण्यात आल्यानंतर आता रक्त तपासण्या, सिटीस्कॅन, एमआरआयसह विविध चाचण्या, धोबीघाट, स्वयंपाकगृहाच्या आऊटसोर्सिंगचा घाट वरिष्ठ पातळीवर रचला जात आहे. 

सरकारी रुग्णालयांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध सेवांचे खाजगीकरण करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दिवसेंदिवस घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढत आहे. तुलनेत सोयीसुविधांमध्ये वाढ होण्यासाठी नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ येते. यंत्रसामुग्री, निधींसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागतो. अपुऱ्या सोयीसुविधात रुग्णसेवा देताना मोठी कसरत करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे, अशा परिस्थितीत रुग्णालयावरील भार कमी करून थेट आऊटसोर्सिंगद्वारे विविध सेवा घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. 

खाजगीकरणाच्या कक्षेत येत आहेत सेवा निविदा प्रक्रिया राबवून आॅक्टोबर २०१७ मध्ये घाटीत कंत्राटदारामार्फत सफाईगार तथा चतुर्थश्रेणीचे ६० कर्मचारी घेण्यात आले. आता विविध प्रकारच्या चाचण्या, स्वयंपाकगृह, धोबीघाटचेही आऊटसोर्सिंग करण्यासाठी पडताळणी केली जात आहे. घाटी रुग्णालयात वर्षभरात विविध आजारांसाठी रक्ताच्या १ लाख ९० हजार चाचण्या होतात, तर दररोज २५ एमआरआय तर ८० ते १०० सिटीस्कॅन केले जातात. दररोज काढण्यात येणाऱ्या एक्सरेचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने तपासणीसाठी तारीख दिली जाते. दाखल होणाऱ्या रुग्णांना घाटीतील स्वयंपाकगृहात तयार होणारे जेवण दिले जाते, तर धोबीघाटमध्ये रुग्णांचे कपडे, चादरी धुतल्या जातात. या सगळ्या बाबी आगामी कालावधीत आता खाजगीतून करून घेण्याकडे सरकारची पावले पडत आहेत.  

धोरणात्मक निर्णयशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील यंत्र दर महिन्याला बंद पडण्याचे प्रकार होतात. यंत्रांची दुरुस्ती करणारे येतच नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाते; परंतु रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे आगामी कालावधीत सिटीस्कॅन, एमआरआय सेवेचे आऊटसोर्सिंग करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे. शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

खाजगीकरणाविरूद्ध आंदोलन सुरूआऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी घेण्यात आल्यानंतर आता धोबीघाट, स्वयंपाकगृहाची माहिती घेण्यात आली. यातून जेवण देण्याचे आणि कपडे धुण्याचे प्रमाण जाणून घेण्यात आले. एकेक विभागाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही खाजगीकरणाची सुरुवात आहे. त्यामुळे याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. - अमोल शेगोकार, सचिव, महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ

डॉक्टरांना प्रात्यक्षिक करता येणार नाही रक्ताच्या चाचण्या किती होतात, याची केवळ माहिती घेण्यात आली आहे. काही चाचण्यांचे खाजगीकरण झाले, तर डॉक्टरांना प्रात्यक्षिक करण्यास मिळणार नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयmedicineऔषधं