शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयाला दुरुस्तीसाठी छदामही मिळेना; कोणी उधारीवरही कामे करेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 17:50 IST

घाटी रुग्णालयाला औषधी, यंत्रसामुग्री, ऑक्सिजनसाठी लाखो, पण दुरुस्तीला १०० रुपयेही मिळेनात

ठळक मुद्देदीड वर्षांपासून निधी बंद असल्याची माहिती १०० हून अधिक कामे रेंगाळलेली

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : तब्बल ६४ एकर जागेत विस्तारलेल्या घाटी रुग्णालय परिसरात ११० छोट्या-मोठ्या इमारती आहेत. कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांत घाटी रुग्णालयाला औषधी, यंत्रसामुग्री, ऑक्सिजनसाठी लाखो रुपयांचा निधी मिळाला. मात्र, त्यांच्या बांधकामाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मिळणारा निधी गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. या कालावधीत १०० रुपयेही त्यासाठी मिळालेले नाहीत. त्यामुळे कोणी उधारीवर कामे करता का, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर ओढावत आहे.

घाटीत विविध इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाकाठी २ कोटींचा निधी देण्यात येतो. यामध्ये रुग्णालयासाठी १ कोटी आणि महाविद्यालयासाठी १ कोटींचा निधी मिळतो. मात्र, कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर हा निधी देणे थांबविण्यात आले. कोरोना उपचारासंदर्भातच निधी देण्यात आला. नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी निधी नसल्याने दुरुस्तीची कामेच ठप्प आहेत. त्यामुळे रुग्णालयापासून तर वसतिगृहापर्यंत कुठे फरशा उखडल्या आहेत, तर कुठे ड्रेनेजलाइन नादुरुस्त झाली आहे. कुठे छताला गळती लागली आहे, तर कुठे स्वच्छतागृहे तुंबली आहेत. वेळेवर पैसे मिळणार नसल्याची कल्पना असल्याने ही कामे करण्यासाठी नकार दिला जात आहे. अधिष्ठाता डाॅ.वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी सोमवारी वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या निधीअभावी इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करता येत नसल्याचे घाटीतील बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

५ कोटींची कामे दुरुस्तीविनाघाटी रुग्णालयात सध्या जवळपास ५ कोटींची देखभाल-दुरुस्तीची कामे तशीच पडून आहेत. देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने डाॅक्टर, कर्मचारी, रुग्ण, नातेवाइकांकडून घाटी रुग्णालयाच्या नावाने ओरड होत आहे, परंतु निधीच नसल्याने कामे करणार कशी, असा प्रश्न बांधकाम विभागाला पडला आहे.

घाटी रुग्णालयाची स्थिती :- ६४ एकरचा परिसर.- ११० इमारती.- १.१७ लाख चाैरस मीटर बांधकाम.- १० ते १२ मोठ्या इमारती.- अनेक ६५ वर्षांहून जुन्या अन् जीर्ण. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद