शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाळूज-कमळापूर रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:44 IST

या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला आहे.

वाळूज महानगर : वाळूज-कमळापूर या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे नागरिक वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला ढोरेगाव, सावखेडा, वाळूज, कमळापूर या रस्त्याच्या कामाला वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ई-निविदा काढण्यात आलेली आहे. या रस्त्याचे काम मे. व्ही.टी. पाटील इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स यांना मिळाले आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते चालढकल करीत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

सद्य:स्थितीत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया दुचाकीस्वार व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाळूज परिसरातील कामगारांना पंढरपूरमार्गे वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे कामगारांचा वेळही वाया जात असून, वाढीव इंधनाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे अधिकारी कानाडोळा करीत असल्याने रविवारी वाळूज येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली. बैठकीत सर्जेराव भोंड, रतन अंबिलवादे, नामदेव इले, अनिल सोनवणे, सुलेमान शेख, श्रीराम बोचरे, पुरुषोत्तम हाडोळे, विश्वनाथ थोरात, सौरभ दरेकर, रणजित कोळगे आदींसह नागरिकांनी १४ फेबु्रवारीला वाळूजला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला.जीएसटीचे कारणया रस्त्याचे काम मे. व्ही.टी. पाटील या ठेकेदाराला देण्यात आले आहे. दरम्यान, जीएसटीमुळे या रस्त्याचे काम लांबणीवर पडले होते. वर्कआॅर्डर पूर्ण होताच तात्काळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.- एच.के. ठाकूर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गंगापूर 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबाद