शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'गॅस एजन्सी मिळवून देतो', ५६ लाखांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 11:31 IST

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देसांगोल्यात दोघे अटकेत देशभरात हे रॅकेट सक्रिय

औरंगाबाद : गॅस एजन्सी मिळवून देतो, अशी थाप मारून वाळूज येथील एका व्यावसायिकास ५६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघा जणांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अटक केली. 

काळू शेख मोहम्मद शेख (३६) व मोहम्मद अवसान रजा (२८, दोघेही ह.मु. सांगोला, जि. सोलापूर, मूळ रा. साहेबगंज, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागरिकांना थाप मारून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीमध्ये अनेक सदस्य सक्रिय असून, सदरील आरोपींच्या अन्य साथीदारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे एक पथक उद्या झारखंडकडे रवाना होणार आहे. 

झाले असे की, वाळूज येथील रहिवासी चांगदेव सोमीनाथ तांदळे (४९) यांची रविकिरण एन्टरप्राईज यांची ही संस्था असून, ते या माध्यमातून इंडस्ट्रीयल सप्लायचा व्यवसाय करतात. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार तांदळे यांनी जळगाव येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कार्यालयात जाऊन पंढरपूर (वाळूज) येथे गॅस एजन्सीसाठी २८ ऑगस्ट २०१९ रोजी अर्ज केला. त्यानंतर २१ जानेवारी २०२० रोजी त्यांनी याच कार्यालयात मुलाखत दिली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर त्यांची निवड झाली. त्यानंतर ५ मे २०२० रोजी संदीप पांडे या नावाच्या व्यक्तीने तांदळे यांना फोन करून गॅस एजन्सीसाठी कागदपत्रे व फोटो मेलवरून मागवून घेतला. गॅस एजन्सी मिळवून देण्यासाठी त्याने तांदळेंना ५६ लाख ६६ हजार खर्च येईल, असे सांगून या खर्चाचे विवरणही समजावून सांगितले.

पांडे याने तांदळे यांना सतत संपर्क साधून विश्वास संपादन केला. त्यामुळे पांडे याने दिलेल्या बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंड्सइंड  बँक व कॉर्पोरेशन बँक खात्यावर तांदळे यांनी ६ मे ते ७ ऑगस्टपर्यंत तब्बल ५६ लाख ६१ हजार ७०० रुपये जमा केले. काही दिवसांंनी तांदळे यांना शंंका आल्यामुळे त्यांनी जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधून पांडे यांच्याबाबत विचारपूस केली. तेव्हा पांडे नावाचा कोणीही कर्मचारी आमच्या कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तांदळे यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट सायबर गुन्हे शाखा गाठून आपबिती कथन केली व तक्रार दाखल केली. 

देशभरात हे रॅकेट सक्रिययासंदर्भात पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले की, केरळ आणि कर्नाटकमध्येही या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असून, तांदळे यांनी जमा केलेल्या बँक खात्यांचे नंबरही तेच आहेत. देशभरात हे रॅकेट सक्रिय असून, टोळीत अनेक सदस्य असण्याची शक्यता आहे. काळू व मोहम्मद हे पूर्वी वाशी मार्केटमध्ये (नवी मुंबई) हमाली करायचे. आता ते शेतकऱ्यांकडून डाळिंब घेऊन ते व्यापाऱ्यांना देण्याचा दलालीचा धंदा करीत आहेत. सध्या तीन महिन्यांपासून सांगोल्यात डाळिंबाच्या व्यवसायासाठी किरायाने राहत होते. फसवणूक केलेल्या पैसा ते या व्यवसायात वापरतात..

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम