शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

‘ऊठ गुरवा, जागा हो! संघर्षाचा धागा हो!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:09 IST

‘गुरव समाजाचा समावेश एसबीसीत झालाच पाहिजे, जातिवाचक शिवीगाळ करून होणारा अपमान थांबलाच पाहिजे, दानपेटी, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर काढून गुरव पुजा-यांना उत्पन्न मिळू दिलेच पाहिजे.’ या व यासारख्या अनेक घोषणांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

ठळक मुद्देऔरंगाबादेत विभागीय आयुक्तालयावर विविध २१ मागण्यांसाठी जोरदार निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘ऊठ गुरवा, जागा हो! संघर्षाचा धागा हो!’, ‘देवस्थान जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.’ ‘गुरव समाजाचा समावेश एसबीसीत झालाच पाहिजे, जातिवाचक शिवीगाळ करून होणारा अपमान थांबलाच पाहिजे, दानपेटी, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर काढून गुरव पुजा-यांना उत्पन्न मिळू दिलेच पाहिजे.’ या व यासारख्या अनेक घोषणांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला होता.औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जोरदार निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. नंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना भेटून मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.प्रश्न ऐकून घेतलेविभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शिष्टमंडळात आलेल्या, विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या गुरव समाजबांधवांचे प्रश्न सहानुभूतिपूर्वक ऐकून घेतले. अनेकांनी त्यांच्या-त्यांच्या प्रश्नांसंदर्भातील कागदपत्रेही भापकर यांना सादर केली. यात बिडकीनचे शरद काळे, पिशोरचे बाबूराव खरे, कडेठाण मंदिराचे चंद्रकांत धुमाळ महाराज व रविकांत साळुंके, नेर, जि. जालनाचे विश्वंभर भाले, अंभईचे रमेश शिंदे, रामेश्वर मंदिराचे सुधीर छत्रपती, राजू वाघमारे, मौजपुरी, जि. जालनाचे विठ्ठल दावलकर, चनेगावचे हरिभाऊ सोनवणे, बाबºयाचे दिलीप सोनवणे, बजाजनगरच्या वैशाली गुरव, नागेश्वर मंदिराच्या सरला मुंगीकर, सिल्लोडचे अंबादास बचाटे, चिंचोलीचे अशोक गजभार, घाटनांद्रा येथील बाळू वाघ यांनी आपापले प्रश्न विभागाीय आयुक्तांसमोर मांडले व त्यांनी ते आपुलकीने ऐकून घेतले.निदर्शकांच्या हातात घोषवाक्यांचे फलक होते. ‘जय काशीबा... जय मंडल’, ‘जय संविधान, जय विज्ञान, हम सब एक है, एक ओबीसी... करोड ओबीसी’ असा मजकूर या फलकांवर लिहिलेला होता. मंडळाचे पदाधिकारी रोहिणी शेवाळे, रामनाथ कापसे, कविता कापसे, दत्ता गुरव, वैभव भंडारे, सुरेखा तोरणमल आदींनी या निदर्शनाचे नेतृत्व केले. सोमनाथ पवार, लक्ष्मणराव गजभार, सर्वेश्वर वाघमारे, प्रकाश उगारे, हिंदूराव गुरव, आबा काळे, पद्माकर पालोदकर, जगदीश आचार्य, रमेश भंडारे, मीना साळुंके, मीना मुंगीकर, सुवर्णा धानोरकर, सुभाष मुंगीकर, अजिंक्य आगलावे, सुनील दांडगे आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.

टॅग्स :agitationआंदोलनDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयSocialसामाजिक