शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सर्वसामान्य रुग्णांना जेनेरिक औषधींचा आधार

By admin | Updated: April 8, 2016 00:25 IST

राजकुमार जोंधळे , लातूर दिवसेंदिवस सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे आता जिकरीचे बनले असून, उपचारावर होणारा हजारो रुपयांचा खर्च सर्वसामन्य रुग्णांच्या कुटुंबियांना न परवडणारा आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरदिवसेंदिवस सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे आता जिकरीचे बनले असून, उपचारावर होणारा हजारो रुपयांचा खर्च सर्वसामन्य रुग्णांच्या कुटुंबियांना न परवडणारा आहे. मात्र नाईलाजास्तव वेळप्रसंगी कर्ज काढून हा खर्च भागविला जातो. परिणामी, वेळेवर उपचार न झाल्यामुळे अनेकांना आपला जिवही गमवावा लागतो. आता सर्वसामान्यांना परवडेल अशाच माफक किंमतीत जवळपास ४५० प्रकारची औषधी लातुरात ‘जेनेरिक औषधालया’च्या माधयामातून उपलब्ध करुन देण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न लाखमोलाचा ठरला आहे.केंद्रिय रसायन आणि खत मंत्रालयाच्या वतीने जवळपास ५०० प्रकारच्या विविध औषधीची निर्मिती करण्यात येते. राज्यात १६ ठिकाणी ‘जन औषधी’ची दुकाने थाटण्यात आली आहेत. मराठवाड्यात जालना आणि लातूर येथे हे जन औषधालय सुरु करण्यात आले आहे. या औषधालयासाठी लातुरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक चव्हाण, प्रशांत चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या जिल्हाभरातुन रुग्णांचे नातेवाईक औषधी खरेदीसाठी गर्दी करुन लागले आहेत. केवळ औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी होत आहेत. वेळप्रसंगी उपचाराचा खर्च झेपत नसल्याने उपचार थांबवावा लागत आहे. शासनाची ‘जेनेरीक औषधी’ अंत्यत स्वस्त आहेत. डॉक्टरांकडून मात्र ती लिहून दिली जात नाहीत, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे. देशी-विदेशी कंपन्यांकडून डॉक्टरांना मोठ्या नफेखोरीच्या सवलतींची खैरात केली जाते. त्यातून हजारो रुपयांची औषधी रुग्णाच्या नातेवाईकांच्या माथी मारली जातात. महिन्याकाठी हजारो रुपयांची लूट आरोग्य क्षेत्रातील या व्यवस्थेकडून केली जाते. याच व्यवस्थेला आव्हान देत सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आम्ही हे ‘जन औषधालय’ सुरु केले असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी सांगितले. आर्थिक लुटीचा उपचार टाळण्यासाठीच जेनेरिक औषधी महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.