शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 19:21 IST

जनरल तिकीट बंदच, ‘एसटी‘ची सेवा ठप्प, प्रवास कसा करायचा? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादमार्गे सध्या केवळ स्पेशल ट्रेन धावत आहेत. यातील बहुतांश रेल्वेगाड्यांना केवळ आरक्षणाच्या बोगी आहेत. जनरल बोगी आणि जनरल तिकिटाची सुविधा अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे आरक्षित बोगीतून गरजेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जनरल बोगी, जनरल तिकिटाची सुविधा देणार नसाल, तर सर्वसामान्यांनी प्रवास कसा करावा, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रवाशांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, जनशताब्दी, मराठवाडा एक्स्प्रेसला जनरल तिकिटाची सुविधा दिलेली नाही. रेल्वेचे तिकीट आरक्षित केलेले असेल तरच प्रवास करता येत आहे. दिवाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. त्यात जनरल तिकीटही मिळत नाही. एसटीची बससेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली आहे. अशा वेळी अनेक प्रवासी थेट विनातिकीट प्रवास करीत आहे. मात्र, आरक्षित बोगीतून विनातिकीट प्रवासी सापडल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, रेल्वेगाड्यांना तात्काळ जनरल बोगी जोडून जनरल तिकिटाची सुविधा देण्याची गरज आहे.

रात्रीच्या वेळी रेल्वे खचाखचदिवाळीच्या सुट्यांनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे भरून जात आहेत. सचखंड, तपोवन, मराठवाडा एक्स्प्रेससह दिवसा धावणाऱ्या बहुतांश रेल्वेचे आरक्षण फुल आहे. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसला प्रवाशांची सर्वाधिक गर्दी आहे.

रोज २०० फुकट्यांवर कारवाईऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दररोज साधारण २०० विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी दिवसभरात १९९ जणांवर कारवाई करून तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेतून उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर तिकीट निरीक्षकांची नजर असते.

सध्या सुरू असलेल्या काही स्पेशल ट्रेन- जनशताब्दी एक्स्प्रेस- सचखंड एक्स्प्रेस- तपोवन एक्स्प्रेस- नंदीग्राम एक्स्प्रेस- देवगिरी एक्स्प्रेस- राज्यराणी एक्स्प्रेस- मराठवाडा एक्स्प्रेस- औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी