शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पोलिस मुख्यालयाच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद

By admin | Updated: July 21, 2014 00:25 IST

हिंगोली : जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पोलिस मुख्यालयाच्या संघाने पटकावले

हिंगोली : जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पोलिस मुख्यालयाच्या संघाने पटकावले असून शनिवारी सायंकाळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, निलेश मोरे, पोनि शंकर सिटीकर, सतीश टाक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. १७ ते १९ जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सीईओ बनसोडे म्हणाले, प्रत्येकाने खेळामध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. पोलिसांनी ताण तणावाची डयुटी करताना येणारी मरगळ दूर करण्यासाठी स्वत: खेळांमध्ये भाग घेतला पाहिजे. तसेच इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. खेळाडू असलेला प्रत्येक कर्मचारी आपल्या कामातही टीम वर्कची मानसिकता ठेवून चमकदार कामगिरी करीत असतो, असेही त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी खेळाचे महत्व सांगून हार-जित यापेक्षा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बेस्ट अ‍ॅथलिट म्हणून संजय शिंदे (वसमत विभाग), हलिमा शेख (ग्रामीण) यांना गौरविण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालयास मिळालेली जनरल चॅम्पीयनशिपची ट्रॉफी पोनि शंकर सिटीकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक मिश्रा यांनी स्विकारले. स्पर्धेसाठी पंच म्हणून जितेंद्र भट्ट, अ‍ॅड. सुभाष वाघमारे, रोषन पठाण, प्रेमसिंह राजपूत, दत्ता बांगर, मेहराज पठाण, आनंद भट्ट, नफिस शेख यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अतुल बोरकर, संजय मार्के आदींनी पुढाकार घेतला.स्पर्धेतील प्रथम व द्वितीय विजेतेफुटबॉल स्पर्धा: उपविभाग हिंगोली ग्रामीण- कॅप्टन शेख अमजद व पोलीस मुख्यालय- कॅ. शेख युनूस. हॉलिबॉल: उपविभाग वसमत- कॅ. भीमराव राठोड व उपविभाग हिंगोली शहर- गिरीश कदम. हॉकी- पोलिस मुख्यालय- मुनीर मुन्नीवाले व उपविभाग हिंगोली शहर गजानन डुरे. बास्केटबॉल: उपविभाग वसमत मुजीब पठाण व पोलिस मुख्यालय- लखन ठाकुर. कबड्डी: उपविभाग हिंगोली ग्रा.- बळीराम शिंदे व पो.मु.- कामाजी झळके . महिला संघातील हॉलिबॉल: उपविभाग हिंगोली शहर- फौजदार कोमल शिंदे व उपविभाग हिंगोली ग्रा.- शेख हलीमा. बास्केटबॉल: उपविभाग हिंगोली शहर- कोमल शिंदे व पो.मु.- ज्योती खिल्लारे. कबड्डी: उपविभाग हिंगोली ग्रा.- फौजदार सविता सपकाळे व उपविभाग हिंगोली शहर-द्वारका सोनटक्के.अ‍ॅथलॅटिक्स- १०० मीटर धावणे: विवेक गुंडरे व संजय शिंदे. २०० मि. धावणे: संजय शिंदे व नवनाथ शिंदे, ४०० मि. धावणे: संजय शिंदे व महादू शिंदे, रिले पोलिस मुख्यालय व उपविभाग हिंगोली शहर. ८०० मि. धावणे नवनाथ शिंदे व अतुल नायसे. १५०० तसेच ५००० मी. धावणे: अनिल बुद्रुक व महादू शिंदे. १०००० मी. धावणे: संजय शिंदे व महादू शिंदे, गोळाफेक: विवेक गुंडरे व काशिनाथ शिंदे. भालाफेक: विवेक गुंडरे व गजानन डुरे. थालीफेक: अतुल बोरकर व विवेक गुंडरे. उंचउडी: सतीश जाधव व संदीप खरवड. लांबउडी: सतीश जाधव व महेश अवचार. ५० मी. फ्री स्टाईल: धनंजय पुजारी व लखन ठाकुर. ५० मी. बटरफ्लाय: धनंजय पुजारी व कैलास आडे. ५० मी. बेस्ट स्ट्रोक: संजय शिंदे व मो. शफी. ५० मी. बॅक स्ट्रोक: कैलास आडे व लखन ठाकुर. कुस्ती गट ५५ कि.ग्रॅ.: गोपीचंद बिगोत व नवनाथ शिंदे. कुस्ती गट ८४ कि.ग्रॅ.: शैलेश चौधरी व प्रभाकर वाघ.महिलांमधील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: १०० मि. धावणे- पूनम वाघमारे व पारु कुडमेथे. २०० मि. धावणे हलीमा शेख व पुनम वाघमारे. ४०० मी. धावणे: हलिमा शेख व पारु कुडमेथे. गोळा फेक: द्वारका सोनटक्के व परविन शाह. भालाफेक: ज्योती खिल्लारे व पूनम वाघमारे. थाळीफेक: हिना चव्हाण व ज्योती खिल्लारे. उंच उडी: पूनम वाघमारे व हलिमा शेख. लांब उडी: हलिमा शेख व पूनम वाघमारे. (प्रतिनिधी)