शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठी हातभट्टी, बनावट देशी दारुचा कारखाना उद्धवस्थ; आरोपीचे बीड कनेक्शन उघड

By राम शिनगारे | Updated: March 3, 2023 19:13 IST

विहामांडवा येथील घटना : ४०० लिटर रसायनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : होळी, धुलीवंदन सणासाठी विहामांडवा परिसरात बनविण्यात येत असलेली गावठी हातभट्टी, बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पथकाने ४०० लिटर रसायनासह तब्बल ६ लाख ३२ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल पकडला. यात कुख्यात योगेश दारासिंग गवळी (२८, रा. विहामांडवा, ता. पैठण) यास बेड्या ठोकल्याची माहिती 'ड' विभागाचे निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली.

उत्पादन शुल्कच्या 'ड' विभागाचे दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे यांच्या पथकास योगेश गवळी याच्या घरात गावठी हातभट्टीसह बनावट देशी दारु तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक शिंदे, दुय्यम निरीक्षक वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, जवान योगेश घुनावत, राहुल बनकर, आश्विनी बोदर व व्हि.जी. चव्हाण यांच्या पथकाने छापा मारला. तेव्हा गवळीच्या घरात बनावट देशी दारुसाठी १८० मिलिलिटरच्या २४० सिलबंद बाटल्या व तयार देशी दारूचे ब्लेंड, हातभट्टी दारू, दारू भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, देशी दारु भिंगरी संत्राच्या बाटल्यावर लावण्यात येणारे जिवंत बुचे सापडले. त्याशिवाय गुळमिश्रित सडवा रसायनापासून हातभट्टी दारू तयार करण्याकरिता लागणारे ४०० लिटर रसायनासह इतर साहित्य मिळाले. पथकाने हातभट्टीच्या दारूसह ६ लाख ३२ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात गवळी याच्यासह त्याचा साथीदार नारायण घुमरे (रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. गवळी यास बेड्या ठोकल्या असून, घुमरे फरार आहे. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आरोपीचे निघाले बीड कनेक्शनहातभट्टी बनविणाऱ्या योगेश गवळी याची विहामांडवा परिसरात प्रचंड दहशत आहे. बनावट दारू तयार करण्यासाठी त्याला घुमरे हा बीडवरून स्पिरीट पाठवत होता. त्याशिवाय बनावट दारूची तिस्करीही गवळी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी मंजुर करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक शिवराज वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद