शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची वाहने बिनधास्त; हे कोण रोखणार? नागरिकांना चिंता

By साहेबराव हिवराळे | Updated: February 8, 2024 19:17 IST

औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे.

छत्रपती संभाजीनगर : अपघातग्रस्त गॅसच्या टँकरने शहरवासीयांचा श्वास कोंडला होता. अथक परिश्रमानंतर शहराचा श्वास मोकळा झाला. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे गॅसची अवजड वाहने रस्त्यावरून जातात. यामुळे एक दिवस वाईट घटनेला आपणालाही सामोरे जावे लागेल की काय, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

औद्योगिक क्षेत्र चिकलठाणा परिसरात विविध टँकर रिफिलिंगसाठी येतात. नुकतेच शहर एका भीषण संकटातून वाचले आहे. अत्यंत कमजोर रस्ता आणि पुलावरून हे जड टँकर गॅस घेऊन कारखान्याच्या दिशेने भरधाव येतात. जालना रोडवरून ही वाहने येेण्यास मज्जाव केला असला तरी नारेगाव रोडवर, लिंक रोडवरून ही वाहने बिनधास्त चालविली जातात. बहुतांश वेळी वाहतूक देखील खोळंबते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कचरा डेपो जवळील पूल कमकुवत असून, रस्त्यावर खाचखळगे पडलेले दिसतात.

रस्ता कमकुवत आणि जीवघेणी वाहतूक नागरी वसाहतीतूनऔद्योगिक क्षेत्रालगत असणाऱ्या या नारेगावच्या नागरी वसाहतीतून १८ टन गॅसने भरलेले टँकर ये-जा करतात. नुकत्याच घडलेल्या अपघाताने नागरिकांच्या मनात भीती आहे .- डॉ. विजय डक

जनतेसाठी आंदोलन छेडण्याची तयारी..स्थानिक नागरिकांना व पंचक्रोशीतील शेतकरी दूध विक्रेते वाढत्या वाहनाच्या रहदारीमुळे जीव मुठीत धरून जात आहेत. लिंक रोडने ही वाहने सरळ नागरी वसाहतीतून जातात, अशा वेळी सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी होते, पर्यायी मार्ग देऊन जड वाहने त्या रस्त्यावरून वळवावीत. हे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात घेतले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.- गणेश वडकर

खबरदारी गरजेची...येथे कामगार आणि शेतकरी आणि मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या जीवाची यंत्रणेने काळजी घ्यावी. नारेगाव व ब्रिजवाडी मार्गे जाणाऱ्या गॅस टँकरची वाहतूक वसाहतीतून नको तर पर्यायी मार्गाने वळवावी.-माजी नगरसेवक भगवान रगडे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात