शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:55 IST

पोलिसांना नऊ तासांनी कळविली घटना, नांदेडमध्येही रात्रीतून एटीएम फोडले

छत्रपती संभाजीनगर : शटर बंद करून आत गॅस कटरच्या साहाय्याने, पडेगाव-मिटमिट्यातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी पहाटे ३:३० वाजता ही घटना उघडकीस आली.

गेल्या काही वर्षांत सातत्याने निर्मनुष्य परिसरातील, महामार्गावरील एटीएम सेंटरला चोरांकडून लक्ष्य केले जात आहे. यापूर्वी पडेगाव रस्त्यावरील एटीएम फोडण्यात आले. मात्र, संबंधित कंपन्यांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. पडेगावच्या तारांगण फाट्याजवळ आतील भागात एसबीआयचे एटीएम सेंटर आहे. पहाटे ३:३० वाजता चोरांनी आत प्रवेश करून शटर बंद केले. गॅस कटरने नोटांचे ट्रेजच बाहेर काढत जवळपास दोन ते तीन लाख रुपये रोख लंपास केली. या प्रकरणी संबंधित कंपनीचे अधिकारी, नांदेड येथेही एटीएम फोडल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी तिकडे गेले आहेत. तिकडे गुन्हा दाखल करून ते तक्रार देण्यासाठी येतील असे कंपनीने छावणी पेालिसांना कळविले.

सेन्सर वाजलेच नाहीछावणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलिसांना एटीएम फोडल्याचे बँकेकडून दुपारी १२:३० वाजता कळविण्यात आले. बँकेच्या मुंबईतील नियंत्रण कक्षात एटीएम सेंटरमधील सेंसर वाजलेच नाही. परिणामी, एटीएम फोडले जात असताना कोणाला कळलेच नाही. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरांचा शोध सुरू असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारी