शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

डेपो नसल्यामुळे कचरा उघड्यावर

By admin | Updated: May 22, 2014 00:54 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात कचरा डेपो नसल्याने कचरा नागरी वसाहतीलगत उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात कचरा डेपो नसल्याने कचरा नागरी वसाहतीलगत उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सिडको वाळूज महानगरात साफ-सफाईचे काम तीन खाजगी ठेकेदारांना देण्यात आले आहे. सिडकोच्या अंतर्गत येणार्‍या विविध नागरी वसाहतीत साफ-सफाई करून हा कचरा ठेकेदार वाहनातून सिडकोच्या जलकुंभाजवळ जमा करतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचर्‍याचा ढिगारा साचला असून, लगतच्या वसाहतीमधील नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. वार्‍याबरोबर हा कचरा नागरिकांच्या घरापर्यंत जात असल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कचर्‍यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून, कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी उघड्यावरील भूखंडावर कचरा जमा झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी हा कचरा पेटवून देतात. यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पसरत असून, प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी सिडको प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासंबंधी तक्रारी वाढल्या आहेत. या संबंधी सिडकोकडे जागरूक नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. मात्र, अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप कमलसिंग सूर्यवंशी, अनिल पनबिसरे, तुळशीराम देवकाते, रामदास काळे, बन्सीलाल सूर्यवंशी, बाबूलाल सूर्यवंशी आदींनी केला आहे.सिडको वाळूज महानगरातील जमा झालेला कचरा साठविण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे हा कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच कचरा डेपोसाठी जागेचा शोध सुरू आहे. या परिसरात कचरा डेपोची आवश्यकता असून, यासंबंधी प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याचे सिडकोचे मालमत्ता अधिकारी ए.एस.वायकर यांनी सांगितले. कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध होताच त्या ठिकाणी कचर्‍याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात येईल, असे वायकर यांनी सांगितले. सिडको प्रशासनाकडून कचरा उघड्यावर टाकला जात असल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वार्‍याबरोबर हा कचरा घरापर्यंत येत असून मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. या भागातील अघोषित कचरा डेपो इतरत्र हटवून नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासातून सुटका करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याची गरज आहे. - दुर्गा सूर्यवंशी सिडको प्रशासनाला कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याचा विसर पडला असून, याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कचर्‍याचे ढिगारे व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात यावे, यासाठी सिडकोकडे सतत पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. - कमलसिंग सूर्यवंशी