शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनाच्या रिक्षाचे डिझाईन चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:37 IST

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा येणार असे मनपानेच जाहीर केले होते. शहरात दाखल झालेल्या रिक्षा मनपाच्या जुन्या रिक्षांप्रमाणेच आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व रिक्षा उघड्या आहेत. पावसाळ्यात कचरा जेवढा ओला होईल, त्याच्या वजनानुसार महापालिका कंत्राटदाराला पैसा देईल.

बंगळुरू येथील कंपनीने शहरात १ टन कचरा उचलला, तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात दररोज साधारण ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा तयार करून आणण्यास सांगितले होते. ओला व सुका कचरा टाकण्याची वेगळी व्यवस्था असावी. कंपनीने चार दिवसांपूर्वी ज्या रिक्षा आणल्या आहेत, त्या उघड्या आहेत. त्यावर ताडपत्री टाकण्यात येईल, अशी व्यवस्था आहे.

शहरात जमा झालेला कचरा कंपनी मनपाला वजन करून देणार आहे. पावसाळ्यात कचºयाचे वजन तीनपट होईल. महापालिकेने कंपनीला ३०० रिक्षा आणाव्यात, असे आदेशित केले आहे. मोजकीच वाहने सध्या कंपनीने आणली आहेत. ९०० कर्मचारी कंपनीला लागणार आहेत. प्रत्येक वाहनावर चालक, एक कर्मचारी, सुपरवायझर यांचा समावेश आहे.

शनिवारी करारमहापालिकेने कंपनीसोबत अंतिम करार शनिवारी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. कंपनीकडून मालक पी. गोपीनाथ रेड्डी, हर्षवर्धन रेड्डी यांची उपस्थिती होती. कंपनीने आणलेल्या वाहनांचे पासिंग लवकर करण्यात येईल. २६ जानेवारीपासून कचरा संकलनाला सुरुवात होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न