शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील कचरा अज्ञातस्थळी रवाना,मनपा म्हणते तीन दिवसांत सर्व कचरा उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:36 IST

पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली.

ठळक मुद्दे मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला

औरंगाबाद : पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये मागील दोन महिन्यांपासून साचलेला तब्बल दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला; पण  हा कचरा नेमका कोठे नेण्यात येत आहे, यावर त्यांनी मौन बाळगले. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एप्रिल महिन्यात शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कचरा उचलून हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव आदी भागात नेऊन टाकण्यात आला होता. १ मेपासून शहरातील कचरा उचलणे बंद होते. त्यामुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगरच उभे राहिले.  

मध्यरात्रीपासून सुरुवातशहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा सोमवारी मध्यरात्रीपासून उचलणे सुरू होते. मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत कचरा उचलून अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी मध्यवर्ती जकात नाका येथे पाहणी केली. त्यानंतर पुन्हा कचरा उचलणे सुरू झाले. औरंगपुरा, किलेअर्क, पदमपुरा, समर्थनगर आदी भागातील किमान २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आला. हा कचरा ३० पेक्षा अधिक वाहनांमध्ये भरून पाठविला. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेने दोन स्थळांचा शोध घेतला आहे.  कचरा कुठे टाकतोय हे   सांगितल्यावर पंचक्रोशीतील नागरिक विरोध करतात. त्यामुळे आम्ही ही बाब गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी नमूद केले.

काहीही करा, पण कचऱ्यावर प्रक्रिया करून द्यामहापालिकेने जंगजंग पछाडल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून द्यायला तयार नाहीत. घंटागाडी पाठवूनही नागरिक रस्त्यावर मिक्स कचरा टाकतच आहेत. मागील दोन महिन्यांपासून कचरा न उचलल्याने २० ते २५ हजार मेट्रिक टन कचरा ठिकठिकाणी पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. सोमवारी कंपन्या आपला डेमो सादर करतील. त्यानंतर लगेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तात्पुरते काम देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. साडेचार महिन्यांत महापालिकेने कचरा प्रश्नावर ठोस निर्णयच घेतला नाही.

आणीबाणीमुळे घेतला निर्णयकचरा प्रश्नात औरंगाबादकर कमालीचे संतप्त होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मंगळवारी तातडीने विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती जकात नाका, चिकलठाणा, हर्सूल येथे पडून असलेल्या कचऱ्यावर त्वरित कंपन्यांनी प्रक्रिया करून द्यावी. दररोज निघणाऱ्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याचे दायित्व कंपन्यांवर सोपविण्यात येणार आहे. 

जकात नाक्यावर डेमोसोमवार ९ जुलै रोजी देशभरातील कंपन्यांना डेमो सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या पडून असलेल्या मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करून दाखवावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. चांगला डेमो असलेल्या कंपनीला जागेवरच काम देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद