परभणी: शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी गंगाप्रसाद आनेराव यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे पदाधिकाऱ्यांत उत्साह असून सायंकाळी शिवसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढून जल्लोष साजरा केला.गंगाप्रसाद आनेराव हे १९८८ पासून विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत सक्रिय आहेत. सर्कलप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख आदी पदावर त्यांनी काम केले. २००२ मध्ये पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर उपसभापतीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आजपर्यंतच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, खा. बंडू जाधव, जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, आ. मीराताई रेंगे यांनी त्यांचे स्वागत केले.(प्रतिनिधी)
शिवसेना जिल्हाप्रमुखपदी गंगाप्रसाद आनेराव
By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST