शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:26 IST

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसणवारी करुन जून महिन्यात कापूस, मका, बाजरी आदींची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे पिके पाण्याअभावी करपली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकºयांना विहिरी, बोअरचे पाणी देऊन या हंगामातील पिके कशी-बशी जगविली होती. यानंतर महिनाभरानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनाची मोठ्या प्रमाणात घट झाली असून, शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरीप हंगामात जेमतेम उत्पादन झाल्याने कर्ज व उसणवारी केलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पासह अनेक गावांतील पाझर तलावात जलसाठा न झाल्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती शेतकºयातून वर्तविली जात आहे.महसूल विभागातर्फे गंगापूर तालुक्यात पीक पाहणी केली असता तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गंगापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद अलीम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद