शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

महामार्गावरील एटीएम फोडणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:07 IST

या टोळीकडून एटीएम फोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : महामार्गावरील एटीएम गॅस कटरच्या मदतीने फोडणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने विविध ठिकाणाहून पकडले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, एटीएम कापण्याकरिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून गॅस सिलिंडर चोरल्याचे, तसेच नांदेड येथून गॅस कटर विकत घेतल्याचे सांगितले. या टोळीकडून एटीएम फोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अमरिकसिंग हजारसिंग (३८, रा. पुराणासाला, ता. जि. गुरुदासपूर, पंजाब, ह.मु. नांदेड), जसविंदरसिंग ऊर्फ हॅपी दलविंदरसिंग (२४, रा. खजाला, ता. बाबा बकाला, जि.अमृतसर, पंजाब) आणि हरपालसिंग ऊर्फ हॅपी अमरजितसिंग (रा. पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, कुंभेफळ फाट्यावरील एसबीआयचे एटीएम २३ डिसेंबर रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात विक्रमसिंग नेगी  यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, सहायक उपनिरीक्षक गणेश भोसले, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी तपास केला असता घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. तेव्हा एटीएम सेंटरपासून काही अंतरावर रस्त्यावर ट्रेलर गाडी उभी दिसली. त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी गाडी आणि चालक अमरिकसिंगची माहिती मिळविली. तेव्हा गाडी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका ट्रान्स्पोर्टची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना वर्धा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एटीएम फोडीविषयी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

महिनाभरापूर्वी रचला कट कुंभेफळ येथील एटीएम सेंटर फोडण्याचा कट आरोपींनी महिनाभरापूर्वी रचला. त्यासाठी त्यांनी रायपूर येथून गॅस सिलिंडर चोरले आणि नांदेड येथून गॅस कटर विकत घेतले. घटनेच्या दिवशी आठ ते दहा तास त्यांनी एटीएमची रेकी केली. त्यात पैसे आहेत अथवा नाही, याबाबतची खात्री करण्यासाठी एका आरोपीने एटीएममध्ये कार्ड स्वॅप केले. पैसे असल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएमचा पत्रा कापला. मात्र पैशाचा ट्रे त्यांना उघडताच न आल्याने ते पळून गेले.

टॅग्स :atmएटीएमRobberyचोरीbankबँकPoliceपोलिस