शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मानलेल्या भावाने पाठविलेल्या नराधमाने मित्रांसह केला सामुहिक बलात्कार

By राम शिनगारे | Updated: April 7, 2024 20:46 IST

अत्याचारानंतर पीडितेची लुट : एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : मानलेल्या बहिणीला दोन हजार रूपये देण्यासाठी पाठविलेल्या मित्रानेच इतर दोन सहकाऱ्यासह आळीपाळीने सामुहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) रात्री ९ वाजेच्या सुमारास केंब्रिज परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आवघ्या पाच तासात मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. उर्वरित दोन आरोपी फरार असून, त्याच्या शोधात पथके पाठविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे एकनाथ नामदेव केदारे (२५, रा. आडगाव) असे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार त्या पती व दोन मुलांसह राहतात. ५ एप्रिल रोजी केस सुरू असल्यामुळे दुपारपासून पतीसह कोर्टातच होत्या. सायंकाळी ६ वाजता घरी पोहचल्यानंतर त्यांनी मानलेल्या भावाला फोन करून २ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्याने माझा मित्र एकनाथला २ हजार रुपये घेऊन तुझ्याकडे पाठवितो असे त्याने सांगितले.

पीडितेच्या पतीला उपवास असल्यामुळे दोघेजण दुचाकीवर खरेदीसाठी किराणा दुकानात आले. तेव्हा पीडितेला मुख्य आरोपी एकनाथने फोन करून २ हजार रुपये देण्यासाठी पिसादेवी चौकात थोड्या वेळेत पोहचत असल्याचे सांगितले. एकनाथ पिसादेवी चौकात आल्यानंतर त्याने केंब्रिज चौकाजवळ एक माणुस थांबला असून, त्याच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला देतो, तुम्ही माझ्यासोबत चला असे पीडितेला सांगितले. त्यानुसार पीडिता एकनाथच्या दुचाकीवर बसून केंब्रिज चौकाच्या परिसरात पोहचली.

एकनाथने सुर्या हॉटेलसमोर दुचाकी थांबवली. त्याठिकाणी आणखी दोघेजण होते. तिघांनी मिळून पीडितेला जवळच्या मोठ्या झाडांमध्ये ओढत नेले. त्याठिकाणी रुमालाने पाय बांधुन तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबुन ठेवले. अत्याचार केल्यानंतर तिघांनी पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल असा एकुण ३० हजार रुपयांचा मुद्देमालही लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या एकाने पिसादेवी चौकात सोडले

पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिघेही निघुन गेले. पीडिता रडतच रस्त्यावर आल्यानंतर नागरिकांनी विचारपुस केली. मात्र, कोणीही मदतीसाठी पुढे आला नाही. पीडिता चालत कचऱ्याच्या कारखान्याजवळ आली. तेथे थोडावेळ थांबल्यानंतर एका दुचाकीवाल्यास मदत मागितल्यानंतर त्याने पिसादेवी चौकात आणून सोडले. तेथून पीडिता घरी पोहचली. पतीला घटनाक्रम सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी