शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarajan: ‘पीओपी’ गणेश मूर्तीचे घरीच करा विसर्जन, जाणून घ्या सोपी पद्धत 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 8, 2022 19:06 IST

‘पीओपी’च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.

औरंगाबाद : शाडू मातीच्या मूर्तीप्रमाणेच आता ‘पीओपी’च्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच करता येणार आहे, असे सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही; पण बाजारात चार टन अमोनियम बायकार्बेनेट आणण्यात आले आहे. याद्वारे ‘पीओपी’ मूर्तीही घरीच विसर्जन करता येणार आहे. एवढेच नव्हे तर मूर्ती विरघळल्यानंतर तयार होणारा अमोनियम सल्फेटचा खत म्हणून वापर करता येतो.

‘पीओपी’च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यातील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) तज्ज्ञांनी अमोनियम बायकार्बेनेटच्या साह्याने ‘पीओपी’ मूर्ती विसर्जनाचा पर्याय दिला आहे. याचा सर्वत्र वापर होत आहे. ज्योतीनगरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठा कृत्रिम हौद तयार करण्यात आला असून, तेथे महापालिकेने मूर्ती विरघळण्यासाठी ४० पोते अमोनियम बायकार्बेनेट दिले आहे.

बाजारातही चार टन अमोनियम बायकार्बोनेट विक्रीला आले आहे. राहुल गुगळे या व्यावसायिकाने सांगितले की, लोकांमध्ये जागृता वाढत असून, ‘पीओपी’च्या मूर्तीचे घरीच विसर्जन करण्याची संख्या वाढत आहे, हे अमोनियम बायकार्बोनेटच्या विक्रीवरून दिसून येते.

कसे कराल ‘पीओपी’ मूर्तीचे विसर्जन- आपल्या घरातील ‘पीओपी’ मूर्तीच्या वजनाइतके अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करावे.- बाजारात अमोनियम बायकार्बोनेट एक किलोच्या पॅकिंगमध्ये मिळते.- त्यानंतर टब किंवा बादली घ्यावी. त्यात पाणी टाकून अमोनियम बायकार्बोनेट टाकावे, हे मिश्रण ढवळून घ्यावे. जेव्हा ही रासायनिक प्रक्रिया सुरू असले तेव्हा वरच्या भागावर पाण्याचे बुडबुडे तयार होऊन अमोनियम वायूचा गंध पसरेल.- त्यानंतर हळूहळू मूर्ती पाण्यात सोडावी. सुरुवातीला काही तास पाण्यावर मूर्ती तरंगत राहील व हळूहळू पाण्याच्या तळाशी जाईल. बादलीवर झाकण ठेवून ती बाजूला ठेवावी. काही तासाने काठीने पाणी ढवळावे. दोन ते तीन दिवसांत मूर्ती पूर्ण विरघळून जाते.

खतासाठी वापरमूर्ती विरघळल्यानंतर त्याचे दोन थर तयार होतात. वरचा थर हा अमोनियम सल्फेट असतो. ते उत्तम प्रकारचे खत असते. या खताचा वापर झाडांसाठी वापरता येऊ शकतो.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद