शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:43 IST

थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे.

पैठण (औरंगाबाद) : मराठवाड्याची लाईफ लाईन व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेले जायकवाडी धरण गेल्या दहा दिवसांपासून अंधारात आहे. एक लाखांचे बिल थकल्याने महावितरणने टोकाची असंवेदनशील भूमिका घेत थेट धरणाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. 

जून महिन्यापासून धरणात आवक होते, त्या दृष्टीने धरणावर अनेक उपाय योजना केल्या जातात. या कालावधीत धरणावर बारीक लक्ष ठेवले जाते. मात्र, थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे. जायकवाडी धरणाचे नियमित बील अदा करण्यात येते. महामंडळाच्या कार्यवाहीत एखादे बील भरण्यास थोडा विलंब होऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जायकवाडी धरणावरील विद्युत पुरवठा खंडीत करू नये, असे लेखी पत्र जायकवाडी प्रशासनाने महावितरण कंपनीला दिलेले आहे. परंतु या पत्राला केराची टोपली दाखवत जानेवारी महिन्यात सुध्दा धरणाचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात न घेता थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

बिल भरले आता रिकनेक्शन चार्जेस भरा....दरम्यान, धरणाचे थकीत वीज बील अदा करण्यात आले आहे. परंतु, आता रिकनेक्शन जार्जेस भरा तरच विद्युत पुरवठा जोडण्यात येईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने बिल भरूनही धरण परिसर अंधारात आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे महावितरण कंपनीला काही देणेघेणे नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे...धरण सुरक्षितता कायदा २०२१ नुसार मर्मस्थळ म्हणून घोषित केलेल्या धरणाचा विद्युतपुरवठा खंडीत करता येत नाही. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी महावितरण कंपनीस सूचना द्याव्यात अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणmahavitaranमहावितरण