शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गेम प्लान बिघडला ! सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:17 IST

या आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदासाठी दावेदार, मातब्बर पदाधिकाऱ्यांनी गावात मोर्चेबांधणीही सुरू केली होती.

ठळक मुद्देपॅनलमध्ये कुणाकुणाला घ्यायचे याची चाचपणी सुरू असतानाच सरपंचपदाचे आरक्षण रद्द नव्याने सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने निवडणुकीनंतर पुढील रणनीती

वाळूज महानगर : राज्य शासनाने घोषित केलेल्या सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उद्योगनगरीत भावी सरपंचांच्या आनंदावर विरजण पडले असून, अनेकांची धाकधूक वाढली आहे.  

आठवडाभरापूर्वीच औरंगाबादसह ८ जिल्ह्यांतील सरपंचपद आरक्षण सोडत काढण्यात आली होती. या आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदासाठी दावेदार, मातब्बर पदाधिकाऱ्यांनी गावात मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, राज्य शासनाने सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी, तसेच खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविणाऱ्यांना चाप बसण्यासाठी निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, पंढरपूर, वडगाव-बजाजनगर, तीसगाव, पाटोदा, नारायणपूर आदी भागांतील राजकारण्यांना धक्का बसला आहे. स

रपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर उद्योगनगरीतील या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी  राजकीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. गावात पॅनलमध्ये कुणाकुणाला घ्यायचे याची चाचपणी सुरू असतानाच सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या मातब्बरांचा हिरमोड झाला. पूर्वी जाहीर झालेले आरक्षण रद्द झाल्यामुळे सरपंचपदावर डोळा लावून बसलेल्यांची धाकधूक वाढली आहे. आता नव्याने सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने निवडणुकीनंतर पुढील रणनीती ठरेल. 

घोडेबाजार रोखण्यास मदत होईल वाळूजच्या माजी सरपंच रंजना भोंड यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या निर्णयामुळे घोडेबाजार रोखण्यास मदत होणार असून, किरकोळ अपवाद वगळता आरक्षणात फारसा बदल होणार नसल्याचे सांगितले.- रंजना भोंड (माजी सरपंच वाळूज)

निवडणुकीतील चुरस वाढणार सरपंचपदाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढणार आहे. नव्याने रणनीती आखावी लागेल. आरक्षणात बदल झाल्यास ऐनवेळी स्पर्धेत नसलेल्या सदस्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडू शकते.  - नंदाताई बडे (ग्रा.पं.सदस्या, रांजणगाव)

टॅग्स :sarpanchसरपंचAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक