शहरातील निर्जनस्थळी दामिनी पथकाकडून गस्त घालण्यात येत असते. दामिनी पथक सलीम अली सरोवर येथे गस्तीवर असताना विनाकारण मोबाइलवर गेम खेळत बसलेल्या १० ते १२ मुलांना चोप दिला. विवेकानंद गार्डन येथे अल्पवयीन मुले नशा करताना आढळले. त्यांनाही चोप देण्यात आला. उद्यानात हजर लोकांशी संवाद साधला. विनाकारण एका ठिकाणी बसून असलेल्या मुलांना समज देऊन हाकलून लावले. विवेकानंद उद्यानात लाइट नाहीत. उद्यानात लाइट लावण्याच्या सूचनाही पथकाने सुपरवायझरांना केली. सुरक्षा रक्षकांनाही समज देण्यात आली. आपली मुले नशेच्या आहारी जाऊ नयेत, यासाठी जागरूक राहत मुलांसोबत संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने उपायुक्त अपर्णा गिते, निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, छाया जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दामिनी पथकाकडून जुगारी, नशेखोरांना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST