शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महत्त्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या प्रदेशाध्यांक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरू केली आहे. आपल्या समर्थकाला मत देण्यासाठी मतदारांना विनंती करण्यात येत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महत्त्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या प्रदेशाध्यांक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरू केली आहे. आपल्या समर्थकाला मत देण्यासाठी मतदारांना विनंती करण्यात येत आहे.विद्यापीठाच्या अधिसभेतील महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापरिषदेसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. चार जिल्ह्यांत मतदार असल्यामुळे उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच आणि बामुक्टो संघटनेच्या उमेदवारांनी सर्व महाविद्यालयांना भेटी देत मतदान करण्याची मागणी केली आहे. मात्र, आता शेवटच्या टप्प्यात सर्व प्रचार फोनाफोनी आणि बैठकांद्वारे करण्यात येत आहे. संस्थाचालक गटातून निवडणूक लढवीत असलेले भाऊसाहेब राजळे यांच्यासाठी थेट विधासभेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही संस्थाचालक मतदारांना फोन करून सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे समजते, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्कर्ष पॅनलमध्ये आपल्या दोन समर्थकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. यामुळे तेसुद्धा या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उत्कर्ष पॅनलचा किल्ला आमदार सतीश चव्हाण एकहाती लढवत आहेत. सर्व नियोजन त्यांच्या कार्यालयातूनच चालते, तर काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विक्रम काळे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह इतर दिग्गज राजकीय नेत्यांनी उत्कर्ष पॅनलला पाठबळ दिले आहे. याशिवाय उत्कर्ष पॅनलमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्यांना उमेदवारी देण्यात आलेली असल्याचे सर्वांचाच पाठिंबा मिळाला असल्याचा दावा उत्कर्षचे उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी केला. विद्यापीठ विकास मंचसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत बैठक घेतली असल्याचे मंचचे निमंत्रक डॉ. गजानन सानप यांनी सांगितले. याशिवाय उत्कर्ष पॅनलच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार चार मते असलेल्या महाविद्यालयातही प्रचारासाठी जात आहेत. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसून आल्यामुळे उत्कर्ष पॅनलवाल्यांना पळता भुई थोडी झाली आहे. या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंच बहुमताने विजयी होणार असल्याचा दावाही डॉ. सानप यांनी केला. डॉ. सानप यांच्या आरोपांविषयी उत्कर्ष पॅनलचे डॉ. राजेश करपे यांना विचारले असता, त्यांनी डॉ. सानप यांना महाविद्यालयात गेल्यानंतर स्वत:ची ओळख करून द्यावी लागते. तसे आमदारांचे नाही. त्यांना मनणारा, ओळखणारा एक वर्ग आहे. आमदारांचे पाय जमिनीवर असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच स्वतंत्र भूमिका घेत विद्यापीठ विकास मंचकडून संस्थेचे तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांना मत देण्यासाठी स्वत: जयदत्त क्षीरसागर प्रयत्नशील असल्याचे समजते. शिक्षक आणि विद्यापरिषद गटात निवडणूक लढवीत असलेल्या बामुक्टोचा एकच ध्यास आहे.प्राध्यापकांचे प्रश्न केवळ संघटनाच सोडवू शकते. यासाठी निवडणुकीत जोरदारपणे उतरलो असल्याचे बामुक्टोच उमेदवार डॉ. विक्रम खिलारे यांनी सांगितले.कोणाला पळता भुई झाली आणि कोणात किती दम आहे हे २६ तारखेला कळेल. त्यापूर्वी बोलण्यात किंवा कोणाला महत्त्व देण्यात काय उपयोग? उत्कर्षकडे प्राध्यापक गटात २,७०० पेक्षा अधिक मतदार आहेत. संस्थाचालक गटात तीन उमेदवार दिले ते सर्व निवडून येतील. प्राचार्य गटातही हीच स्थिती आहे. एक-दोन अपवाद वगळता उत्कर्ष पॅनल सर्व जागा जिंकेल.-सतीश चव्हाण, आमदार,मराठवाडा पदवीधर मतदारसंघआतापर्यंत निवडणूक एकतर्फी होत असे. यावेळी आम्ही प्रबळ विरोधक म्हणून उभे ठाकलो. लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. जालना, बीड जिल्ह्यांतील प्रस्थापित मंडळीसुद्धा आमच्यासोबत असल्यामुळे विजय निश्चित आहे.- गजानन सानप,निमंत्रक, विद्यापीठ विकास मंचविद्यापीठ अधिसभा निवडणूक पुढे ढकलल्याची अफवाऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मीडियावर उठवल्या आहे. याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांना विचारले असता, त्यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसून, या अफवा असल्याचे सांगितले.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याविषयी बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली आहे. यावर कोणताही निर्णय झाला नसून, पुढील सुनावणी शुक्रवारी (दि.२४) होणार आहे. मात्र याच दिवशी मतदान आहे.विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढे ढकलल्याची अफवा विद्यापीठ विकास मंचचे संस्थाचालक गटातील उमेदवार चंद्रकांत मुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून उठवली असल्याचा आरोप मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांनी केला.एका उमेदवाराने न्यायालयाचा हवाला देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने मुळे यांच्यावर अफवा पसरविल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी उमेदवार चंद्रकांत मुळे यांना विचारले असता त्यांनी संबंधित मेसेज चुकीने पाठविण्यात आला असून, त्याबद्दल दिलगीर असल्याचे सांगितले.याविषयी सोशल मीडियावर काही लोकांनी मेसेज टाकून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने निवडणूक स्थगित झाली असून, निवडणुकीची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे टाकले आहे. यामुळे शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी विद्यापीठाच्या कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अफवा असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे पोर्टल तयार केलेले आहे. त्यावर देण्यात येणारी सूचना ही अधिकृत असते. त्यावर निवडणूक पुढे ढकलली किंवा काही बदल झाले याविषयी कोणतेही पत्र टाकण्यात आलेले नाही. किंवा न्यायालयाने असा कोणताही निकाल दिल्याचे विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणूक होत आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले.