शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"भावी उपमुख्यमंत्री संजय शिरसाट"; छत्रपती संभाजीनगरात बॅनर, समर्थकांची उत्सुकता शिंगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:41 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहेत. यात आमदार संजय शिरसाट हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मागील पाच वर्षांत व महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारात मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या आमदार संजय शिरसाट यांना नव्या सरकारमध्ये आपण मंत्री होणार असा ठाम विश्वास आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी शिरसाट यांच्या समर्थकांनी त्यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून शहरात बॅनर लावले आहे. हे बॅनर शहरवासीयांचे लक्ष वेधत आहे.

महायुतीच्या सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी होईल, अशी घोषणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) या पक्षाचे हे सरकार असेल. मुख्यमंत्री कोण आणि गृहमंत्रिपद कोणाकडे, तसेच कोणत्या पक्षाचे किती मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील, याविषयी अद्याप अंतिम निर्णय गुलदस्त्यात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार विजयी झाले आहेत. यात आमदार संजय शिरसाट हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

मंत्री अन् जिल्ह्याचा पालकमंत्री होणारमागील सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. आता ते जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांनी आपण मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा सांगितला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये बॅनर लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे सिडकोचे अध्यक्ष, तर काहींनी मंत्रिमहोदय म्हणून बॅनर लावलेले आहेत. आता तर उस्मानपुरा चौकालगत कमानीवर भावी उपमुख्यमंत्री म्हणून आ. शिरसाट यांचे बॅनर लावले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे