शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बागडेंना दणका देण्यासाठी फुलंब्रीत शिवसेना-काँग्रेसची ऐनवेळी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:47 IST

शिवसेनेचे चंद्रकांत जाधव सभापतीपदावर विराजमान 

ठळक मुद्देफुलंब्री कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणूक 

फुलंब्री : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे चंद्रकांत जाधव हे सभापतीपदी निवडून आले. त्यांना १८ पैकी १७ संचालकांची मते मिळाली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शेवटच्या क्षणी भाजपवर कुरघोडी करीत शिवसेनेसोबतची जुनी मैत्री जपली. 

फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविली होती. यात काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, तर भाजपचे ३ संचालक निवडून आले होते. मागील तीन वर्षांपासून काँग्रेसचे संदीप बोरसे सभापती होते. दुसऱ्याला संधी देण्यासाठी त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. 

सभापतीपदासाठी आज २४ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली. काँग्रेसने शिवसेनेला अडीच वर्षे उपसभापतीपद देण्याचे वचन दिले होते ते पाळले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली. सेनेने भाजपसोबत जाऊन सभापतीपदासाठी जुळवाजुळव सुरूकेली. त्यांना काँग्रेसच्या दोन सदस्यांची साथ मिळाली. त्यामुळे शिवसेना -भाजपकडे ९, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे ९ असे समसमान संचालकांची संख्या झाली. 

भाजपची खेळी उधळलीविधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या संचालक संगीता संतोष मेटे यांना आज मंगळवारी सकाळी अचानक भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर भाजपने मेटे यांना सभापतीपदासाठी उमेदवारी दिली. हा डाव उधळून लावण्यासाठी डॉ. कल्याण काळे यांनी शिवसेनेचा सभापती करण्यास बिनशर्त पाठिंबा दिला. या नाट्यमय घडामोडीबाबत भाजप अनभिज्ञ राहिली. अगोदर ‘डमी’ उमेदवार म्हणून चंद्रकांत जाधव यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे न घेता तसाच ठेवला. त्यामुळे ऐनवेळी भाजप संचालकांची गोची झाली. दुसरीकडे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झालेल्या संगीता मेटे यांना भाजपच्याच दोन संचालकांनी विरोध केला. उर्वरित सर्व संचालकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाषराव गायकवाड, शिवसेनेचे चंद्रकांत जाधव, तर भाजपकडून संगीता मेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, दुपारनंतर काँग्रेस उमेदवाराने आपली उमेदवारी माघे घेतली व शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भाजपचे संचालक एकाकी पडले. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात शिवसेना उमेदवाराला १७, तर भाजपच्या उमेदवारला स्वत:चे एकच मत मिळाले. सभापतीपद मिळविण्यासाठी भाजपने काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते; पण ऐनवेळी शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने भाजपची पंचायत झाली.  

काँग्रेस- शिवसेना जुनी मैत्री कायम गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस- शिवसेनेची मैत्री आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत केली. काँग्रेसनेही नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे यांना मदत केली होती. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी जुन्या मैत्रीला आज पुन्हा उजाळा दिला.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक