कळमनुरी : विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर १९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता.मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार के.एम. विरकुंवर उपस्थित होते. ओटीएसपी योजनेचा निधी वाढवावा, म्हाडा योजनेतील भ्रष्टाचार दूर करून त्याची व्याप्ती वाढवावी, आदिवासींच्या रिक्त जागा भरा, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण जिल्ह्यात सुरू करा, आदिवासी हस्तांतरण जमीन कायद्याच्या तरतूदीनुसार पात्र कुटूंबाला लाभ द्या, सर्व वित्त सहाय्यकांमध्ये आदिवासींना १८ टक्के वाटा द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अॅड. आर.आर. कोरडे, टी.के. टापरे, विठ्ठल उगले, पद्माकर लांडगे, दौलतखॉ पठाण, किसन काशिदे, बळीराम खंदारे, हफीजखॉ पठाण, शंकरराव सेंदुशे, कुंडलिक साबने, कचरू पाचपुते, बजरंग साबने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)वृक्षारोपनवारंगा फाटा : येथे वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेत कृषीदुतांनी वृक्षारोपन केले. जि.प.सदस्य राजेश्वर पतंगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामराव पतंगे, दत्तराव कदम, रंगराव कदम, पालकर, कृषीदूत विष्णू साळोक, भागवत काशीद, गणेश क्षीरसागर, सुमीत सावले, संदीप खेडकर, विकास कोतावार, किशन गायकवाड, मोहम्मद फैसल, सुभाष कोल्हे, सचिन राजूरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: August 20, 2014 00:23 IST