शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चेबांधणीला आला वेग

By admin | Updated: April 7, 2015 01:23 IST

बीड : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँगेसला जिल्हा बँक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोर्चेबांधणीची मोठी कसरत करावी लागणार आहे

बीड : सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राष्ट्रवादी काँगेसला जिल्हा बँक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मोर्चेबांधणीची मोठी कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या स्वत: जिल्हा बँक निवडणूकीचे लिड करणार की, पॅनल प्रमुख म्हणून जिल्ह्यातल्या एखाद्या भाजप च्या नेत्याकडे जबाबदारी देणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय बीड भाजप जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहे. सातवर्षापूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत महायुती करण्यात आली होती. आत बँकेवर आपल्याच गटाचे वर्चस्व असले पाहिजे, यासाठी अनेकांनी उघड नव्हे पण अंधारातून लंगोट लावलेला आहे. कारण जिल्हा बँक ताब्यात असणे म्हणजे जिल्ह्यातील राजकीय भूषण आहे. बँक ताब्यात असेल तर कार्यकर्त्यांशी नाळ जोडून रहाते. शिवाय सतत कार्यकर्त्यांच्या गऱ्हाड्यात रहाण्याची सवय असलेल्यांना तर जिल्हा बँकेच्या रूपाने आता संधी आली आहे. हे सर्व जाणून असलेल्या नेत्यांनी आपापल्या पॅनलची तयारी करण्यास सुरू केले आहे. एकूण १९ जागांसाठी निवडणूका होत आहेत. आता भाजप, शिवसेना व मित्रपक्ष एकत्रीत पॅनल उभा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन दिवसात नियोजनाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचे अजून निश्चित झालेले नाही. पुढील दोन दिवसात राकॉच्या नेत्यांची बीडमध्ये बैठक आयोजीत केली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)