शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 2, 2024 17:34 IST

१३ मेरोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात लग्नसराई असली तर उमेदवारांसाठी पर्वणीच ठरते. कारण, लग्नात हजारो मतदारांची एकाच ठिकाणी भेट होते व अप्रत्यक्षपणे प्रचारही होतो. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी जर लग्नतिथी असेल तर त्यादिवशी मतदानाची टक्केवारी घसरते. मात्र, यंदा ३ मेपासून लग्नसराईच्या धामधुमीला पुढील ५७ दिवसांसाठी ब्रेक लागणार आहे. यामुळे १३ मेरोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे.

मे महिन्यात दोनच लग्नतिथ्यापुढील ‘मे’ महिनाभरात दोनच लग्नतिथ्या पंचांगात देण्यात आल्या आहेत. यात १ व २ मे या दोन तिथ्या आहेत. ३ मेपासून लग्नमुहूर्त नाहीत. थेट २९ जूनलाच पुढील मुहूर्त आहे. यामुळे तब्बल ५७ दिवस लग्नमुहूर्त नाहीत.

तीन वर्षांत मे महिन्यात किती लग्नतिथी?वर्ष व तारीखमे २०२३ : २ व १२मे २०२४ : १ व २मे २०२५ : १, ५, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १६, १७, २०, २३, २४

नवरदेव-नवरी येतात मतदानाला; वऱ्हाडींचे काय?मतदानाच्या दिवशी लग्न असेल तर नवरदेव-नवरी मतदानासाठी येतात. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो; पण त्यांच्या लग्नाला आलेले वऱ्हाडी, केटरर्सकडील काम करणारा मोठा फाैजफाटा यांचे काय? त्यातील किती जण मतदान करतात, हा प्रश्न आहे. मात्र, यंदा १३ मेरोजी मतदानाच्या दिवशीच नव्हे तर त्याच्या आसपासच्या तारखांनाही लग्नतिथी नसल्याने मतदानाची टक्केवारी वाढू शकते.

लग्न, मौंजीत प्रचारमात्र, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत उमेदवारांनी अनेक मंगल कार्यालयांत जाऊन लग्न सोहळ्यांना भेट दिली. उपनयन संस्कार सोहळ्यांतही हजेरी लावून अप्रत्यक्ष प्रचार करीत संधीचे सोने केले.

प्रचार यंत्रणेवरील ताण कमीराजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, यंदा १३ मेरोजी सोमवारी लग्नतिथी नाही. यामुळे प्रचार यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. नाही तर लग्नसराईतून लोकांना आवाहन करून मतदान केंद्रात आणावे लागले असते. मात्र, उष्णतेची लाट असल्याने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४marriageलग्न