शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून, टाऊन हॉल परिसरातील घटना

By राम शिनगारे | Updated: May 12, 2023 22:45 IST

आरोपी जखमी, घाटीत उपचार सुरू.

छत्रपती संभाजीनगर : पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याचा घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली आहे. रत्यावरच हा खूनाचा प्रकार घडला. खून करणारा आरोपी जखमी झाला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली.

कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे तर अजय काशीनाथ चव्हाण (२५, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कैलास यांच्या दोन्ही मुलांसोबत आरोपी अजय चव्हाण याची मैत्री आहे. काही वर्षीपूर्वी अजय चव्हाण हा सुद्धा जयभीमनगरमध्ये राहत होता. त्यातुन त्याची ओळख होती. कैलास वाकेकर हे रंग देण्यास इतर प्रकारचे काम करून उदारनिर्वाह करीत होते. तर अजय चव्हाण हा सुद्धा रोजंदारीवर काम करीत होता.

त्याचा कामावर जाण्या येण्याचा मार्ग टाऊन हॉल परिसरातुन होता. शुक्रवारी तो घराकडे जात असताना रस्त्यावरच कैलास वाकेकर यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातुन दोघात वाद सुरू झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अजयने त्यांना रस्त्यावर पाठीमागून चाकूने भोसकले. त्यात कैलास रस्त्यावरच कोसळले. तेव्हा घटनास्थळावर आरोपी अजय यासही बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषीत केले. त्यानंतर जखमी आरोपीलाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

भर रस्त्यावर खूनाची घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच बेगमपुराचे निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्यासह इतरांनी धाव घेत पंचानामा केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी