शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 19:07 IST

अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या  याचिकेवरील निर्णयानंतर परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची  निवडणूक घेऊ, असे यापूर्वी शासनातर्फे खंडपीठात करण्यात आलेले निवेदन शुक्रवारी शासनाने मागे घेतले.

औरंगाबाद : अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या  याचिकेवरील निर्णयानंतर परभणी जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची  निवडणूक घेऊ, असे यापूर्वी शासनातर्फे खंडपीठात करण्यात आलेले निवेदन शुक्रवारी शासनाने मागे घेतले.  परिणामी  जिल्हा उपनिबंधकांना चेअरमनपदाच्या निवडीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करावा लागेल व त्यानुसार ही निवडणूक होऊ शकेल, असे सरकारी वकिलांनी सांगितले.निवेदन मागे घेण्याची परवानगी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सुभाष तांबे यांनी खंडपीठास केली होती. न्या. व्ही. एल. आचलिया यांनी त्यांची विनंती मान्य करून निवेदन मागे घेण्याची परवानगी दिली.  

अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर ११ जून २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शासनाच्या वरील निवेदनामुळे दुर्राणी यांच्या याचिकेच्या निर्णयानंतरच चेअरमनपदाची निवडणूक होणार होती. ती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली गेली होती. दरम्यान, आज द्वारकाबाई कांबळे, चोखट आदींनी वरील याचिकेत दिवाणी अर्ज दाखल करून दुर्राणी यांची याचिका केवळ त्यांच्या अपात्रतेसंदर्भात आहे. त्यासाठी चेअरमनपदाची निवडणूक पुढे ढकलणे संयुक्तिक नसल्याचे म्हटले होते. दरम्यान या दिवाणी अर्जांवरील सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकिलांनी ‘ते’ निवेदन मागे घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने ती दिली व शासनाने ते निवेदन मागे घेतले. त्यावरुन खंडपीठाने दिवाणी अर्जही निकाली काढले. दुर्राणी यांच्या वतीने अ‍ॅड. मनीष त्रिपाठी यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, मुळ तक्रारदार प्रभाकर शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. एन. आर. तावडे यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुभाष तांबे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठparabhaniपरभणीbankबँक