औसा : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी औसा तालुका पञकार मित्र मंडळाच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून गुरुवारी १०५ प्रवाशांचे पंढरीच्या दर्शनासाठी प्रस्थान झाले़या मोफत बस सेवेचा शुभारंभ तहसीलदार अहिल्या गाठाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले, पोलिस निरीक्षक विकास जाधव, माजी नगराध्यक्ष सुरेशप्पा कारंजे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, माजी नगरसेवक सिद्रामप्पा मिटकरी, पं़ स़ सदस्य बस्वराज धाराशिवे, संतोषप्पा मुक्ता, संजय उजळंबे, मोहनराव सोनटक्के आदींच्या उपस्थितीत झाले़ दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक वारकऱ्यांना इच्छा असूनही पंढरपूरला जात येत नसल्याचे पाहून औसा तालुका पत्रकार मित्र मंडळाच्या वतीने यंदा हा उपक्रम राबविण्यात आला आहे़ यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सगरे, राम कांबळे, काशिनाथ सगरे, विजय बोरफळे, रमेश दुरुगकर, समीर डेंग, विनायक मोरे, महेबुब बक्षी, विवेक देशपांडे, गिरीधर जंगाले, चांगदेव माळी, वामन अंकुश, किशोर जाधव, रमेश शिंदे, रोहित सगरे, देविदास सुरवसे, दयानंद बनाळे, मुक्तेश्वर पडसळगे, सिधन भेटेकर आदी उपस्थित होते़
१०२ वारकऱ्यांना मोफत पंढरीचे दर्शन
By admin | Updated: July 15, 2016 00:52 IST