शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना मोफत उच्च शिक्षण; या अटी ठाऊक आहेत का?

By राम शिनगारे | Updated: July 18, 2024 20:16 IST

अटींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीस शैक्षणिक व परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांमध्ये राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील वार्षिक काैटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क १०० टक्के देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्या अटींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीस शैक्षणिक व परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ असणार आहे.

मुलींना उच्च शिक्षण मोफतव्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने मुलींचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमीव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींना शैक्षणिक व परीक्षा शुल्कमाफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींचे कौटुंबिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. त्याविषयीचे पुरावेही संबंधित यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.

कशासाठी मिळेल मोफत प्रवेश?उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांमध्ये राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

कोठे मिळेल?राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठ व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास या योजनेचा लाभ घेता येईल.

यापूर्वी होती ५० टक्के सवलतयापूर्वी विद्यार्थिनींना ५० टक्के शुल्काची सवलत होती. त्यात आता वाढ करून १०० टक्के करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काटेकोरपणे अंमलबजावणी होईलउच्च शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाची विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. नियमांची पूर्तता करून योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थिनींना मिळेल, यासाठी उच्च शिक्षण संचालकाच्या मार्गदर्शनात कार्यवाही केली जाईल.- डॉ. रणजितसिंह निंबाळकर, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद