शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी बनवेगिरी करणाऱ्या शिक्षकांना अभय; औरंगाबाद जिल्हा परिषदेची कारवाईत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 18:13 IST

खोट्या माहितीच्या आधारे सोयीच्या शाळेवर बदली करून घेणाऱ्या ८० शिक्षकांची जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चौकशी पूर्ण केली.

ठळक मुद्देशिक्षकांनी खोटी माहिती भरून राज्यस्तरीय बदली कक्षाची दिशाभूल के ल्याच्या तक्रारी  प्राप्त झाल्या होत्या.प्रशासनाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. त्यामध्ये बहुतांश शिक्षक दोषी आढळले; परंतु अद्याप एकाही शिक्षकाविरुद्ध कारवाई नाही.

औरंगाबाद : खोट्या माहितीच्या आधारे सोयीच्या शाळेवर बदली करून घेणाऱ्या ८० शिक्षकांची जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चौकशी पूर्ण केली. त्यामध्ये बहुतांश शिक्षक दोषी आढळले; परंतु अद्याप एकाही शिक्षकाविरुद्ध कारवाई केलेली नाही.

सार्वत्रिक बदलीच्या वेळी आॅनलाईन नोंदणी करताना प्रामुख्याने संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती भरून राज्यस्तरीय बदली कक्षाची दिशाभूल के ल्याच्या तक्रारी  प्राप्त झाल्या होत्या. प्रशासनाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. तत्पूर्वी, सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळण्यात आली. त्यामध्ये ८० शिक्षक संशयास्पद आढळून आले होते.  खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांमुळे २१५ एकल शिक्षिकांना दुर्गम व दूर अंतरावरील शाळांवर बदलीने पदस्थापना मिळाली आहे, तर २३५ पती-पत्नी शिक्षकांना विभक्त व्हावे लागले. त्यामुळे सध्या अनेक जण दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत.

२१ जून रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांच्या उपस्थितीत जि.प. सभागृहात शिक्षकांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल, सर्व गटशिक्षणाधिकारी,  विस्तार अधिकाऱ्यांनी आॅनलाईन नोंदणीच्या वेळी राज्यस्तरीय बदली कक्षाला सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. दोषी शिक्षकांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सादर झाला.  

तथापि, बदलीच्या वेळी खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. दोषी शिक्षकांची एक वेतनवाढ बंद करावी. अशा शिक्षकांची बदली रद्द करून त्यांच्यामुळे विस्थापित शिक्षकांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्यांना पदस्थापना द्यावी व विस्थापित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांवर पुन्हा पदस्थापना द्यावी, असेही ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाच्या या आदेशांकडे जि.प.ने दुर्लक्ष केले आहे. 

आठवडा अखेर कारवाईयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, मेडिकल बोर्डाकडून ७-८ शिक्षकांनी आरोग्याचे प्रमाणपत्र जोडलेले होते. त्यांची सत्यता तपासणीसाठी ते बोर्डाकडे पाठविले आहे; पण त्यांच्याकडून अद्याप अहवाल आलेला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांचीही काही प्रमाणपत्रे आहेत. त्यांचाही अहवाल आलेला नाही. फक्त जिल्हा आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. या आठवडाअखेर अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर लगेच कारवाई प्रस्तावित केली जाईल.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTransferबदली