शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट परताव्याचे आमिष देऊन ७ जणांना १५ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 19:08 IST

तक्रारदार आणि गुंतवणूकदारानी जुलै महिन्यात ठोंबरेचे गाव गाठले

ठळक मुद्देआरोपीने गुंतवणूकदाराना धमकावले 

औरंगाबाद: पिग्मी व्यवसायात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून सैनिकांच्या पत्नीसह ७ जणाना १४ लाख ९४ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या कुटुंबाविरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय बाळासाहेब ठोंबरे, संजयची पत्नी इंदूबाई ठोंबरे, मुलगा सचिन ठोंबरे आणि नितीन ठोंबरे (सर्व. रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगांव, मूळ रा. दिदृड, ता. माजलगाव, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रेखा भगवान गायकवाड (रा. माजी सैनिक कॉलनी , पडेगांव) यांचे पती केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. आरोपी आणि तक्रारदार यांच्यात जुनी ओळख आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपी पती-पत्नी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा पिग्मी व्यवसाय करतो. त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दोन वर्षात दुप्पट परतावा मिळेल असे सांगितले. ही बाब त्यांनी पटवून सांगितली आणि पैशाची हमी दिली. यामुळे तक्रारदार यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी २ लाख १६ हजार रुपये गुंतवणूक केले. 

त्यांच्याप्रमाणेच शुभम शंकर घोडके यांनी ३ लाख ६ हजार रुपये, नंदा संभाजी गजले यांनी २लाख १६ हजार रुपये, मथुरा भिका घुगे यांनी २ लाख १६ हजार, हमिदा आमीर खान पठाण (मनिषा कॉलनी वाळूज) यांनी २ लाख १६ हजार ,हरिदास नामदेव पवार (फिरदोस गार्डन ) यांनी २ लाख १६ हजार रुपये आणि लता वसंत गवंदे यांनी १ लाख ८ हजार रुपये गुंतवणूक केली. तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारांची मुदत मार्च महिन्यात समाप्त झाली यामुळे त्यांनी ठोंबरे कुटुंबाकडे दुप्पट रक्कमेची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्या कुटुंबाला कोरोना झाल्याचे कारण सांगून पैसे नंतर देतो असे सांगितले. यानंतर ते गावी दिदृड ला निघून गेले होते. 

आरोपीने गुंतवणूकदाराना धमकावले यामुळे तक्रारदार आणि गुंतवणूकदारानी जुलै महिन्यात ठोंबरेचे गाव गाठले असता आरोपी संजय हा घरी नव्हता. आरोपी सचिन आणि नितीन यांनी त्यानाच माझ्या वडिलांचे तुमच्याकडे पैसे आहे असा कांगावा केला. आणि तुम्ही येथून निघून जा असे धमकावले. यानंतर तक्रारदार आणि अन्य गुंतवणूकदारानी आर्थिक गुन्हे शाखा गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. या अर्जाची सखोल चौकशी करून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुंह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. भागिले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी