शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब ‘निषेधासन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:21 IST

शहर-जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी गांधी पुतळा, शहागंज येथे निषेधासन आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

औरंगाबाद : शहर-जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी गांधी पुतळा, शहागंज येथे निषेधासन आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सत्तेत येण्यापूर्वी युवक महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी या सर्वच समाजघटकांना भावनिक आमिष दाखवून भाजपने फसविले आहे. आश्वासनपूर्ती न करता ‘तो चुनावी जुमला होता’ असे भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात. ही क्रूर चेष्टा होय’ असा आरोप तांबे यांनी यावेळी केला.जलयुक्त शिवार योजना फसली आहे. महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला अपयश आले आहे. देशाच्या परकीय गंगाजळीत घट झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नाही. नोटबंदी व जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नोकऱ्या देतो म्हणून बेरोजगारांना फसविण्यात आले. अशा एक ना अनेक अपयशांकडे या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.सरकारचे मंत्री, पदाधिकारी व प्रवक्ते नुसतेच वाचाळवीर झाले आहेत. ते शेतकºयांनाही शिव्या देतात. देशाचे चौकीदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेलप्रकरणी मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप तांबे यांनी केला. रस्त्यावरच विविध आसने करून व सरकारच्या विरोधात नारे देरून करण्यात आलेल्या या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी मुक्तद्दीर देशमुख, प्रदेश प्रतिनिधी डॉ.जितेंद्र देहाडे, प्रदेश महासचिव आदित्य पाटील, आमेर अब्दुल सलीम, प्रदेश सचिव अखिल पटेल, प्रभाकर मुठ्ठे पाटील, शहर उपाध्यक्ष नीलेश अंबेवाडीकर, मोहसीन खान, गौरव जैस्वाल, मुजाहेद पटेल, नासीर नजीर खान, शेख अथर, खालेद पठाण, सचिन शिरसाठ, मोईन इनामदार, अश्फाक पठाण, उमर पठाण, शेख शफिक सरकार, इरफान इब्राहिम पठाण, नदीम सौदागर, सलमान पटेल, नदीम पटेल, सलीम खान, इम्रान पठाण, इरफान खान, शोएब अब्दुल्ला, शेख अजहर, जावेद देशमुख, शेख सलीम, पठाण जावीद, आमेर खान, अ‍ॅड.सलीम शेख, सय्यद जुबेर, इंजिनिअर इफ्तेखार, साजिद कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.नरेंद्र मोदी हे जगात जाऊन योगाबद्दल सांगत असतात. त्याच योगाच्या भाषेत युवक काँग्रेसने हा निषेध नोंदविला. या अभिनव आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण