शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात चार कोटी जनता व्यसनी; दरवर्षी 'एकच प्याला' घेतो ३ लाख जणांचा जीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:37 IST

महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचे मंचने म्हटले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील गल्लीबोळांत व्यसनासाठी दारू, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफू, गांजा, ताडी इ. वैध व अवैध प्रकारात सहज उपलब्ध होत आहेत. यात सुमारे चार कोटी जनता कुठल्या ना कुठल्या व्यसनात अडकली आहे. याप्रमाणे सरासरी प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती ही व्यसनाधीन आहेच. दरवर्षी सुमारे ३ लाख ५३ हजार ५८४ पेक्षा जास्त नागरिक दारू प्याल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे ४५ हजार कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामीण भागात आता पाऊचमध्ये अवैध दारू उपलब्ध होत आहे. सुमारे १२ ते साडेबारा लाख इतकी दारू विक्रेत्यांची संख्या आहे. हे लोक वैध, अवैध दारू विकतात. 

सुमारे १०० संस्था, संघटनांच्या सहभागाने व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचची स्थापना करण्यात आली आहे. अविनाश पाटील, माधव बावगे, वर्षा विद्या विलास आदींचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या संख्येतील २५ टक्केमहिला दारूसारख्या व्यसनाच्या अधीन झालेल्या पतीकडून रोज अमानुष मारहाण, मानसिक त्रास सहन करतात. ६२ टक्के नागरिकांचा आक्षेप आहे की, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, हप्तेखोरीमुळे अवैध दारू, गुटखा यासारखी व्यसने बंद होत नाहीत. २० टक्के नागरिकांनी राजकीय नेते, पुढारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरले आहे. ६४ टक्केनागरिकांचे म्हणणे आहे की, दारू विक्रेत्यांना पर्यायी कामधंदा उपलब्ध आहे; परंतु श्रम न करता पैसे कमविण्याच्या लालसेपोटी हे काम केले जाते. 

महाराष्ट्रातील सुमारे १० जिल्ह्यांमध्ये दारूबंदी करण्याची मागणी तेथील महिला, युवा आणि सामाजिक- राजकीय संस्था, संघटनांकडून केली जात आहे. ती मान्य करून दारूबंदी केली पाहिजे व वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. २०२० हे महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूmedicineऔषधंcancerकर्करोग