शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याचे चार मास्टरमाईंड अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:19 IST

bogus sports certificate scam आरोपी टोळीने राज्यातील विविध तरुणांना ट्रंपोलिन आणि टंबलिन या खेळाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा सहभाग घेऊन क्रमांक मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विक्री केले होते.

ठळक मुद्देआरोपींमध्ये निवृत्त क्रीडा उपसंचालक, क्रीडा अधिकारी, पाटबंधारे विभागाचा कारकून आणि एजंटाचा समावेश२५ हजार ते तीन लाख रुपये या किमतीत आरोपींनी तब्बल २६८ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले होते.

औरंगाबाद : ट्रंपोलिन आणि टंबलिंन या खेळाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या चार मास्टरमाईंड आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.निलंबित क्रीडा अधिकारी भावराव रामदास वीर (५२), निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रेय महादवाड, पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून शंकर शामराव पतंगे आणि एजंट अंकुश प्रल्हाद राठोड (रा. पारेगाव, ता. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, आरोपी टोळीने राज्यातील विविध तरुणांना ट्रंपोलिन आणि टंबलिन या खेळाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा सहभाग घेऊन क्रमांक मिळविल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विक्री केले होते. २५ हजार ते तीन लाख रुपये या किमतीत आरोपींनी तब्बल २६८ जणांना बनावट प्रमाणपत्र दिले होते. आरोपी पतंगे आणि राठोड हे ग्राहक शोधून आणत. त्यानंतर ते बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव तयार करत. हा प्रस्तावानुसार आरोपी वीर बनावट प्रमाणपत्र तयार करून देत. या सर्व प्रमाणपत्राची पडताळणी आरोपी क्रीडा उपसंचालक महादवाड हा करुन देत. बोगस प्रमाणपत्र असल्याचे माहिती असूनही महादवाड ने ते खरे असल्याची पडताळणी करून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याची माहिती मिळाल्यावर याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणि नागपूत येथे स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. जवाहरनगर ठाण्यातील गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांचे पथक करत आहे. पथकाने तपास करून या रॅकेटच्या मास्टर माईंड असलेल्या चारही आरोपींना १९ ते २१ मार्चदरम्यान अटक केली.

पत्ते बदलून दिले प्रमाणपत्रआरोपी पतंगे आणि राठोड हे क्रीडा संघटनेचे पदाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. त्यांची ओळख महादवाड आणि वीर यांच्यासोबत होती. पतंगे आणि राठोड यांनी औरंगाबाद उपसंचालक कार्यालयाच्या क्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील तरुणांना ते औरंगाबादचे रहिवासी असल्याचे दाखवून बनावट क्रीडा प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात समोर आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी