शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

औरंगाबाद जिल्ह्यात ३ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:45 IST

मृतात दाम्पत्य, युवक, पादचाऱ्याचा समावेश : पैठण, लिंबेजळगाव, दौलताबादनजीक वेगवेगळ्या दुर्घटना

पैठण/दौलताबाद/लिंबेजळगाव : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतात पती-पत्नी, युवक व एका पादचाºयाचा समावेश आहे.पैठणनजीक कारने पती-पत्नीला उडविलेपैठण-शहागड रस्त्यावर गोपेवाडी फाटा परिसरात समोरून येणाºया कारने धडक दिल्याने मोटारसायकलजवळ उभे असलेले पती-पत्नी ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी १० वाजता घडला. आत्माराम बाबूराव गवांदे (५५) व मंगलाबाई आत्माराम गवांदे (५०, रा. माळवाडी- गुरुधानोरा ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाल्यावर गंभीर जखमी झालेल्या या दाम्पत्याला तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला. पैठण-नवगाव रस्त्यावर नायगाव फाट्याच्या पुढे चंदू निवारे यांच्या शेताजवळ भरधाव कारने (क्र. एमएच २०-७२७३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलला (क्र. एमएच २० डीक्यू -३२२१) जोराची धडक दिली. यावेळी हे दाम्पत्य मोटारसायकलसमोरच उभे होते. त्यांनाही कारने उडविले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून, कारचालक घटना घडल्यानंतर फरार झाला आहे. पुढील तपास जमादार किरण शिंदे करीत आहेत.चौकट...अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घालादरम्यान, हे शेतकरी दाम्पत्य नवगाव-तुळजापूर (ता. पैठण) येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी चालले होते, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दाम्पत्याच्या अकाली मृत्यूमुळे गुरुधानोरा परिसरावर शोककळा पसरली आहे, असे आमच्या सावखेडा व लिंबेजळगावच्या वार्ताहरांनी कळविले आहे.लिंबेजळगानजीक पादचाºयास चिरडलेलिंबेजळगाव बसस्थानकाजवळ एका बाजूला दुचाकी उभी करून रस्ता दुसºया बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाल्याची घटना घडली. विनोद उत्तम परदेशी (३५, रा. सावखेडा, ता. पाचोरा, जि. जळगाव), असे अपघातातील मृताचे नाव आहे. सदर इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना नागरिकांनी सदर इसमाला पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, येथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दौलताबादनजीक ट्रकने घेतला दुचाकीस्वाराचा बळीदौलताबादनजीक भरधाव ट्रकच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-नाशिक मार्गावरील एका शाळेसमोर शनिवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली. संदीप कचरू पवार (रा. माळीवाडा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुपारी ४ वाजेच्या सुमारास संदीप दुचाकीवरून औरंगाबाद-नाशिक महामार्गावरून जात असताना येथे जैन इंटरनॅशनल स्कूलसमोर ट्रकने (क्र. एचआर-६९ ए-५५०५) दुचाकीला (क्र.एम.एच-२० ईडी-८४९२) जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दौलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आर. बी. राठोड, के. के. खिलारे, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी संदीपला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास दौलताबाद पोलीस करीत आहेत.९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्नमयत संदीपच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. तो एका मोबाईल कंपनीच्या टॉवरचे काम करीत होता. विशेष म्हणजे ९ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस