शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

सवंदगावात चार भावांची घरे आगीत जळून खाक

By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST

सवंदगाव : गावापासून जवळ असलेल्या धुळे वस्तीवर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

सवंदगाव : गावापासून जवळ असलेल्या धुळे वस्तीवर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.वस्तीवरील रावसाहेब किसन धुळे, कैलास रावसाहेब धुळे, भाऊसाहेब धुळे, राजाराम धुळे हे चारही कुटुंब बाहेर झोपलेले असताना त्यांच्या घरांना लागलेल्या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. घटनेची माहिती कळताच तलाठ्याने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या कुटुंबियांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी या चारही पीडित कुटुंबियांनी केली आहे. यावेळी भारत कदम, गंगाधर धुळे, पोलीस पाटील ए. एल. म्हस्के, नामदेव कदम, लक्ष्मण रुस्तुम धुळे, सोमीनाथ सोनवणे, एम. डी. कदम, भाऊनाथ धुळे, तुकाराम कवडे आदींची उपस्थिती होती़ गाडीचालकाला इजा नाहीघाटनांद्रा : मक्याचा कडबा दुसऱ्या शेतात बैलगाडीतून घेऊन जात असताना अचानक आग लागल्याने दोन्ही बैल आगीने होरपळून जखमी झाले. या आगीत पुंजाराम पल्हाळ यांना इजा झाली नाही़पल्हाळ गव्हाळी शिवारातून त्यांच्याच बैलांना वैरण म्हणून मक्याचा कडबा बैलगाडीतून घेऊन जात होते़ पल्हाळ हे गाडीत कडबा असल्याने लाकडी जुवावर बसून बैलांना हाकलत होते. मागील बाजूने लागलेली आग त्यांच्या लक्षात आली नाही. बैलांना मागच्या बाजूने चटके बसत असल्याने बैल जोरात पळत होते. त्यामुळे आग भडकली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी आरडाओरड केली व धावणाऱ्या बैलांना थांबवण्याचा प्रयत्न केला़ यानंतर पल्हाळ यांनी गाडीतून उडी मारली़ मात्र तोपर्यंत बैलांच्या मागील भागास चटके बसल्याने गंभीर जखमा झाल्या. या आगीत पल्हाळ यांना इजा झाली नाही. बैलांवर पशुवैद्यकीय अधिकारी धनंजय महाजन यांनी उपचार केले. छपरास आगघाटनांद्रा : येथील अहमद तडवी यांच्या शेतातील छपरास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे जीवित हानी झाली नाही. घराच्या पाठीमागे आग लागल्याने लक्षात आले नाही. छपरात ठेवलेले शेती उपयोगी व संसारोपयोगी साहित्य, रासायनिक खताच्या ८-१० बॅग, ठिबक सिंचनचे दोन एकरातील साहित्य, इलेक्ट्रिक मोटारपंप व आॅईल इंजिन, कांद्याचे तयार करून ठेवलेले बियाणे, लागवड करण्यासाठी खरेदी केलेले ५ क्विंटल अद्रकचे बियाणे व इतर साहित्य जळून खाक झाले.