शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग

By संतोष हिरेमठ | Updated: January 14, 2025 19:30 IST

अग्निशामक यंत्रणेचे काम अडकले ८० टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात गेल्या ४ वर्षांत ४ वेळा विद्युत यंत्रणेमुळे शाॅर्टसर्किट, स्पार्किंग आणि आगीच्या ४ घटना घडल्या. सुदैवाने प्रत्येक वेळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मात्र, घाटीत जागोजागी अजूनही धोकादायक अवस्थेत विद्युत वायरिंग आणि विद्युत यंत्रणा पाहायला मिळते. शिवाय फायर फायटिंग यंत्रणेचे कामही ८० टक्क्यांवर अडकले आहे.

घाटी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात (ओ.टी.) सिझेरियन प्रसूती सुरू असतानाच ऑक्सिजन सिस्टिमच्या अलार्म पॅनलला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने परिचारिका आणि डाॅक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घाटी रुग्णालयाचा मुख्य कणा म्हणून सर्जिकल इमारतीची ओळख आहे. आजघडीला या इमारतीत जागोजागी विद्युत वायरिंग, डीपी, विद्युत यंत्रणेच्या बाॅक्सची अवस्था चिंताजनक आहे.

अग्निशमन सिलिंडरवरच मदारघाटीत फायर फायटिंग सिस्टिम कामासाठी २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आजघडीला हे काम ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे आजघडीला आगीसारख्या प्रसंगी अग्निशमन सिलिंडरवर मदार आहे.

घाटीतील यापूर्वीच्या घटना...- घाटीतील किचनमध्ये १७ ऑक्टोबर २०२० रोजी गुळाच्या भेलीच्या खोक्याला आग लागली होती.- २२ जून २०२१ रोजी घाटीतील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच इलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली होती. सुदैवाने या घटनेत १८ शिशू सुखरूप बचावले.- घाटीतील ‘आयसीसीयू’मध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक बेडला २९ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री आग लागली होती.- २१ एप्रिल २०२४ रोजी घाटीतील अपघात विभागावरील नर्सिंग होमच्या रूममला शाॅर्टसर्किटने आग लागली होती.

टप्प्याटप्प्यात दुरुस्तीविद्युतीकरणाचे काम हे टप्प्याटप्प्यात करण्यात येत आहे. घाटीतील फायर फायटिंग सिस्टिमचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आजघडीला ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी