शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींच्या विटांचा झाला चिखल; अवकाळी पावसाच्या तडाख्याने वीटभट्टी उद्योग कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:35 IST

विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे.

ठळक मुद्देगोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे.पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल

पैठण :  बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पैठण परिसरातील जवळपास ८० लाख कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या विट निर्मिती उद्योगाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला असून  विट उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसाने ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून या अगोदर अवकाळीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर  फटका बसला नसल्याचे बोलले जात आहे. 

गोदाकाठच्या उत्कृष्ट मातीमुळे निर्माण होणारी पैठणची वीट लोकप्रिय आहे. या विटांना बांधकामासाठी मोठी मागणी असल्याने शेकडो वर्षापासून पैठण परिसरास वीटांचा उद्योग सुरू आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती पैठण परिसरात होत आहे. पैठण शहरातील गोदाकाठ परिसरासह सिध्देश्वर मंदीर, पाटेगाव, शहागड रोड परिसरात पाच ते सात किलोमीटर पर्यंत विटभट्यांचे जाळे उभे राहिले आहे. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवस नुसते वादळ वारे घोंघावल्याने वीटभट्टी चालकांचा जीव भांड्यात पडला होता. बुधवारी सायंकाळी मात्र पैठण परिसरास जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या तडाख्यात भाजण्यासाठी तयार असलेल्या लाखो विटांचा चिखल झाला.  

चार कोटींचे नुकसान.....परिसरातील वीटभट्ट्यावर साधारणपणे ८० ते ९० लाख कच्च्या वीटांचा माल तयार होता या विटाभिजल्या असून त्यांचे चिखलात रूपांतर होणार आहे. या विटांंचा चिखल झाल्याने एकंदरीत तीन ते चार कोटी रूपयांचे नुकसान झाले असे वीटभट्टी मालक संतोष धापटे यांनी सांगितले. 

शेवटचा माल आमचा नफा असतोसध्या वीटभट्टी हंगामाचा शेवट सुरू आहे.  पावसाने जो माल भिजला तो शेवटचा माल होता. परराज्यातील मजूर वीटा थापून परत गेले आहेत. चिखलाच्या परत विटा थापण्यासाठी आता मजूर उपलब्ध नाहीत. विटभट्टी मालकासाठी शेवटच्या भट्ट्या हाच नफा असतो. मात्र, दुर्दैवाने अवकाळी पावसाने संपूर्ण माल भिजल्याने वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वीटभट्टी मालक पवन शिसोदे यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस