शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

माजी कुलगुरू चोपडे विद्यापीठातील गैरव्यवहारांच्या १६ प्रकरणांमध्ये दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 18:04 IST

विद्यापीठाचे ‘नॅक’कडून २५ ते २७ मार्च २०१९ दरम्यान मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनापूर्वी रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब ‘लोकमत’ने दि.१० ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चार भागांच्या वृत्तमालिकेतून उघडकीस आणली होती.

ठळक मुद्देउच्चशिक्षणमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती‘नॅक’च्या उधळपट्टीच्या चौकशीसाठी समिती

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्यावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी माजी कुलगुरू एस.एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली होती. या समितीने १६ प्रकरणांमध्ये डॉ. चोपडे यांना दोषी ठरवले, तसेच त्यांच्याच काळात झालेल्या ‘नॅक’च्या कामावरील उधळपट्टीच्या चौकशीसाठी उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ३० दिवसांत अहवाल सादर करील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.

विद्यापीठाचे ‘नॅक’कडून २५ ते २७ मार्च २०१९ दरम्यान मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनापूर्वी रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब ‘लोकमत’ने दि.१० ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चार भागांच्या वृत्तमालिकेतून उघडकीस आणली होती.या घोटाळ्यावर विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण, आ. हेमंत टकले, आ. विक्रम काळे आणि आ. अमरनाथ राजूरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न शुक्रवारी चर्चेला आला. यावेळी आ. काळे यांनी, माजी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या काळात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला तरी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 

विद्यापीठाच्या अधिसभेतही चौकशी समितीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीतही ‘नॅक’च्या उधळपट्टीच्या चर्चेवरून जोरदार गोंधळ झाला. बैठकीत सदस्य प्रा. सुनील मगरे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत चार महिन्यांपूर्वी अधिसभेच्या बैठकीत समितीची स्थापना होऊनही समिती सदस्यांना पत्र मिळत नसतील, तर कसे होणार? असा सवाल विचारला. यावर कुलगुरूंनी समितीच्या एका सदस्याने काम करण्यास नकार दिला आणि अध्यक्षांवर आक्षेप घेतल्यामुळे व्यवस्थापन परिषदेत पुन्हा मुद्दा चर्चेला आल्याचे सांगितले. च्शेवटी संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन झाली. या समितीत दोन सदस्य आहेत. ही समिती तीन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करील, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. या चर्चेत डॉ. राजेश करपे, अ‍ॅड. विजय सुबूकडे आदींनी सहभाग नोंदवला.

आठ दिवसांत माजी कुलगुरुंवर कारवाई उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत विधान परिषदेत म्हणाले की, ‘नॅक’च्या  उधळपट्टीवर करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल अद्यापही आलेला नसल्यामुळे उच्चशिक्षण विभाग उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ३० दिवसांत चौकशी अहवाल सादर केला जाईल, तसेच  एस.एफ. पाटील समितीने केलेल्या चौकशीत एकूण १६ प्रकरणांमध्ये चोपडे दोषी आढळले आहेत. सध्या ते सेवानिवृत्त असल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करावी? यासाठी विधि विभागाचा सल्ला मागविला असून, येत्या ८ दिवसांत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, गरज असेल तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. या चर्चेत आ. अंबादास दानवे, आ. हेमंत टकले आणि आ. निरंजन डावखरे यांनीही सहभाग नोंदवला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादUday Samantउदय सामंत