शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

शिवसेनेच्या माजी उपमहापौरांनी खासदारांकडे मागितला विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:55 IST

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून खासदारपदी आरुढ झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे सेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी चक्क ५० लाख रुपये विकास निधीची मागणी केली आहे. सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून जलवाहिनीसाठी निधी मागितल्याने एमआयएमच्या भुवया उंचावल्या आहेत. आता इम्तियाज जलील विकास निधी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देजलवाहिनीसाठी ५० लाख द्या : मनपाच्या आर्थिक स्थितीमुळे काम करणे अशक्य

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून खासदारपदी आरुढ झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे सेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी चक्क ५० लाख रुपये विकास निधीची मागणी केली आहे. सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून जलवाहिनीसाठी निधी मागितल्याने एमआयएमच्या भुवया उंचावल्या आहेत. आता इम्तियाज जलील विकास निधी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वॉर्ड क्र. ११० मयूरबन कॉलनीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या स्मिता घोगरे यांनी भाजपच्या उमेदवार स्वाती संजय जोशी यांचा ३८३ मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यानंतर घोगरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत १५ महिन्यांसाठी त्यांना उपमहापौरपदही दिले होते. मागील काही वर्षांपासून घोगरे सेनेत सक्रियही आहेत. महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. विकासकामे होत नाहीत, म्हणून सर्वच पक्षांचे नगरसेवक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेनेचे नगरसेवकही या समस्येतून सुटलेले नाहीत. सत्ता असूनही नसल्यासारखी अवस्था सेना नगरसेवकांची आहे. वॉर्डातील विकासकामे मार्गी लागावी म्हणून सेनेचे पदाधिकारी कधीच बैठक घेत नाहीत. अधिकाऱ्यांना सूचनाही देत नाहीत. त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे वाटत असल्याचे अनेक नगरसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेनेच्या नगरसेविका तथा माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांना शंभूनगर येथे जलवाहिनी टाकायची आहे. त्यासाठी त्यांनी मनपा आयुक्त, अधिकारी सर्वांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. शेवटी काम झालेच नाही. दरवेळी निधीचे कारण समोर करून फाईल बाजूला ठेवण्यात आली. शेवटी घोगरे यांनी सोमवारी थेट नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांच्याकडे जलवाहिनीसाठी ५० लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती एमआयएममधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शंभूनगर भागात सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक राहतात. त्यांच्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आता इम्तियाज जलील सेनेच्या माजी महापौरांना विकास निधी देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदारांचा विकास निधी मिळावा म्हणून अगोदर एमआयएमचे नगरसेवक रांगेत आहेत.नागरिकांची गरज लक्षात घेणारखासदार हा संपूर्ण जिल्ह्याचा असतो. विविध पक्षांचे नगरसेवक विकास निधीची मागणी करतात. शंभर टक्के घोगरे यांच्या पत्राचा विचार करण्यात येईल. नागरिकांची गरज लक्षात घेऊन काम करण्यात येईल. नगरसेवक कोण हा विचार अजिबात होणार नाही.इम्तियाज जलील, खासदार

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना