शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

फसवणुक प्रकरणात दीड वर्षांनंतर माजी उपजिल्हाधिकारी गावंडेंची पोलिसांत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:03 IST

महागड्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दीड वर्षांपूर्वी अनेकांना अनेकांना गंडा

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी औरंगाबाद खंडपीठाने दिला अटकपूर्व जामीन

औरंगाबाद : बचत गटात गुंतवणूक केल्यास महागड्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दीड वर्षांपूर्वी अनेकांना अनेकांना गंडा घातला. या प्रकरणातील सहआरोपी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी पहिल्यांदाच आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. 

अंगणवाडीसेविका संगीता दीपक कस्तुरे (वय ३०, रा. बायजीपुरा) यांनी पुंडलिकनगर ठाण्यात दीड वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती की, ८ मे २०१९ रोजी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी कस्तुरे यांच्या नणंद सरिता उमेश बाबरेकर (रा. पुंडलिकनगर) यांच्याकडे गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांची सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा. पुंडलिकनगर) हिच्याशी भेट झाली होती. तेव्हा म्हेत्रेने त्यांना परभणीतील सावित्रीबाई फुले महिला बचत गटातर्फे घरगुती वापराच्या महागड्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत दिले जातात. तसेच हा बचत गट सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांचा आहे. मात्र, ते शासकीय नोकरीत असल्याने आपल्या नावावर हा व्यवसाय पुढे नेत आहे, असे सुरेखा म्हेत्रे यांनी सांगितले होते. 

सेवानिवृत्त झाल्यानंतर गावंडे हे पुंडलिकनगर येथे सुरेखा म्हेत्रे यांच्या घरी यायचे. तेव्हा ते आमिषाला बळी पडलेल्या अनेकांना ‘तुमची फसवणूक होणार नाही. तुमचा फायदाच होईल’, असा धीर द्यायचे. तेव्हा अनेक नागरिकांनी म्हेत्रे यांच्याकडे धनादेश, ‘आरटीजीएस’द्वारे मोठ्या रकमा जमा केल्या. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी गावंडे यांना संपर्क केला. तेव्हा १९ ऑगस्ट रोजी सुरेखा म्हेत्रेला सोबत घेऊन गावंडे हे करमाड परिसरात एका हॉटेलवर आले. आठ दिवसांत सर्वांचे पैसे परत देण्याचे आश्वासन देऊन ते तेथून निघून गेले. अखेर नागरिकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त तक्रारीवरुन, पोलिसांनी या गुन्ह्यात सुरेखा म्हेत्रे हिस मुख्य आरोपी तर विश्वंभर गावंडे यांना सहआरोपी केले आहे.

खंडपीठात अटकपूर्व जामीनयासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब सिंगारे यांनी सांगितले की, गावंडे यांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर फसवणुकीच्या या गुन्ह्यात ते खरेच सहआरोपी आहेत का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या कामात पोलिसांना गावंडे यांनी सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ते रविवारी आर्थिक गुन्हेशाखेत आले. आम्ही चौकशी करीत आहोत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी