शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:26 IST

कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात.

औरंगाबाद : कोणत्याही देशात हुकूमशाही येण्याअगोदर मजबूत संस्था उद्ध्वस्त केल्या जातात. हीच प्रक्रिया देशात सुरू आहे. या विरोधात समविचारी लोकांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी युवकांना केले.युथ फॉर डेमोक्रॅसी आणि निर्धार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘सोच से सोच की लढाई’ हा संवादात्मक कार्यक्रम बुधवारी (दि.२३) तिरुमला मंगल कार्यालय, गारखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, पत्रकार अमेय तिरोडकर, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे आणि राष्ट्रीय समन्वयक मनीष शर्मा यांची उपस्थिती होती.आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागील साडेचार वर्षांत मोदी-शहा जोडीने सीबीआय, आरबीआय, न्यायव्यवस्था, यूजीसी, केंद्रीय विद्यापीठे, बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकशाहीच्या स्तंभांवर नियंत्रण मिळवले आहे. हुकूमशाही येण्याची हीच लक्षणे आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना हाताशी धरून राफेल घोटाळा दाबण्यात येत आहे. हा न्यायालयाचा अवमान वाटत असेल, पण दिलेल्या निर्णयाचे अवलोकन करणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संघ विचाराचे लोक भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद ताब्यात घेत ५ हजार वर्षांचा इतिहास बदलण्याचा अजेंडा राबवीत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधी हत्येनंतर संघावर बंदी घातलेली मूळ अभिलेखे गायब केली आहेत. उलट त्याच पटेल यांना स्वत:चा बाप बनवून घेत असल्याची टीकाही डॉ. आव्हाड यांनी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड